येरवडा (जिल्हा पुणे) – येरवडा कारागृहात बंदीवानांनी नानासाहेब मारणे या हवालदारास त्यांच्याच काठीने केलेल्या मारहाणीत त्यांच्या मनगटाचे हाड मोडले आहे. या प्रकरणी नानासाहेब मारणे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यावरून अपूर्व खंडागळे, सूरज अडागळे, आनंद उपाख्य सोनू धड आणि नीरज ढवळे या बंदीवानांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
येरवडा कारागृहातील सी.जे. विभागात दगडी भिंत पाडून नवीन बांधकाम चालू करण्यात आले आहे. मारणे सकाळी गस्तीवर असतांना तेथील बंदीवानांना भिंतीचा दगड लागल्यास इजा होईल, असे त्यांनी सांगितले. त्यावरून बंदीवानांनी मारणे यांच्या हातातील काठी हिसकावून घेत त्यांना लाथाबुक्क्यांनी डोक्यात, हातावर मारहाण केली.
संपादकीय भूमिकाबंदीवानांकडून मार खाणारे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ? |