पीलीभीत (उत्तरप्रदेश) येथे अपघातात ३ कामगारांचा मृत्यू !

पीलीभीत (उत्तरप्रदेश) – येथे झालेल्या एका भीषण अपघातात ३ कामगार ठार झाले, तर ३३ हून अधिक जण घायाळ झाले. हे सर्व जण मुरादाबाद येथे मजुरीचे काम करण्यासाठी जात होते. कामगार ‘डीसीएम्’ ट्रकमधून प्रवास करत होते. या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन महामार्गावरील झाडाला धडकल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घायाळांना ट्रकमधून बाहेर काढले. घायाळ कामगारांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात भरती करण्यात आले.