No Import Of Ammunition:भारतीय सैन्यदल यापुढे शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा आयात करणार नाही !

नवी देहली – भारतीय सैन्यदल यापुढे शस्त्रास्त्र आणि दारूगोळा आयात करणार नाही. सैन्यदलाने पुढील आर्थिक वर्षापासून दारूगोळ्याची आयात पूर्णपणे बंद करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सैन्यदलाच्या आवश्यकतेनुसार शस्त्रास्त्रांचा पुरवठा आता देशांतर्गत उद्योगांकडून केला जाणार आहे; कारण देशांतर्गत उद्योगांनी सर्व मागण्या पूर्ण करण्याची क्षमता वाढवली आहे.

भारतीय सैन्यदलाचे मेजर जनरल व्ही.के. शर्मा म्हणाले की, सैन्यदल सध्या वार्षिक ६ ते ८ सहस्र कोटी रुपयांचा दारुगोळा खरेदी करत आहे. आता त्यांचा पुरवठा भारतीय स्रोतांकडून होईल. लवकरच भारतीय आस्थापने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही एक प्रमुख भूमिका बजावू शकतात, असा विश्‍वास मेजर जनरल शर्मा यांनी व्यक्त केला.

संपादकीय भूमिका

यासाठी स्वातंत्र्यानंतर ७७ वर्षे जाऊ लागली, हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !