डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी पुणे सी.बी.आय. विशेष न्यायालयाने डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, श्री. विक्रम भावे आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना निर्दोष मुक्त केले, ही अतिशय आनंददायक घटना आहे. न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना दोषी ठरवले आहे.
खोट्या आरोपांखाली सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना फसवण्यात आले !
– अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालयSanatan Sanstha I Hindu Janajagruti Samiti#Sanatan_Innocence_Proved #Sanatan_HinduTerror_Mythhttps://t.co/TRBihpDxjR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 10, 2024
या विरोधातही मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करणे आवश्यक आहे. या प्रकरणात खोट्या आरोपांखाली सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना फसवण्यात आले आहे. दोषी ठरवण्यात आलेले कळसकर आणि अंदुरे हेही मुंबई उच्च न्यायालयात निर्दोष सिद्ध होतील.