अयोध्येतील श्रीराममंदिरात माजी सनदी अधिकार्याने दिले सोन्याचे रामचरितमानस !
अयोध्या येथील श्रीराममंदिरासाठी मध्यप्रदेशातील माजी सनदी अधिकारी सुब्रह्मण्यम् लक्ष्मी नारायण यांनी सोन्याचे रामचरितमानस भेट दिले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी या रामचरितमानसची मंदिरातील गर्भगृहात स्थापना करण्यात आली.