PM Modi On Heatwave : पंतप्रधान मोदी यांनी घेतली उष्णतेच्या परिस्थितीविषयी आढावा बैठक !

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उन्हाळ्याच्या संदर्भात ११ एप्रिलला बैठक घेत उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीच्या सिद्धतेचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी यांनी केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील सर्व सरकारी संस्था यांना एकत्रितपणे काम करण्यास सांगितले.

या बैठकीला पंतप्रधानांचे मुख्य सचिव, गृह सचिव, भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अधिकारी उपस्थित होते. मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता अधिक आहे.