Weather Alert : देशातील १४ राज्यांमध्ये पावसाची शक्यता !

नवी देहली – भारतीय हवामान विभागाने उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आणि तमिळनाडू ही १४ राज्ये, तसेच  पुद्दुचेरी आणि अंदमान निकोबार येथे १३ एप्रिलला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

एकीकडे देशात पावसाळ्यामुळे तापमानात घट झाली आहे. त्याचबरोबर काही भागांत तीव्र उष्णतेचा परिणाम दिसून येत आहे. कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यांच्या किनारी भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.