कोलकाता (बंगाल) – बेंगळुरू येथील रामेश्वरम् कॅफे बँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) कोलकाता येथून अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजिब या दोघांना अटक केली आहे. यांतील ताहाने संपूर्ण षड्यंत्र रचले होते, तर शाजिबने कॅफेमध्ये बाँब ठेवला होता. शाजिब हा मुख्य आरोपी असून अब्दुल मतीन ताहा हा सहआरोपी आहे. दोघेही शिवमोग्गा जिल्ह्यातील तीर्थहळ्ळी येथील रहिवासी आहेत. ते दोघेही इस्लामिक स्टेटच्या स्थानिक गटाचे सदस्य आहेत. या दोघांच्या शोधात कर्नाटक, तमिळनाडू आणि उत्तरप्रदेश या राज्यांत १८ ठिकाणी धाडी घालण्यात आल्या होत्या. या दोघांवर १० लाख रुपयांचे बक्षीसही घोषित करण्यात आले होते. या स्फोटाच्या प्रकरणी भाजपचा कार्यकर्ता साईप्रसाद यालाही अटक करण्यात आली आहे.
सौजन्य ET NOW