महेंद्रगड (हरियाणा) – येथे ११ एप्रिल या दिवशी कनिना गावाजवळ खासगी शाळेच्या बसला झालेल्या अपघात ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर २० विद्यार्थी घायाळ झाले होते. या प्रकरणी आता पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापिका, बसचालक आणि एक शिक्षक यांना अटक केली आहे. तसेच ‘ईदनिमित्त सुट्टी असतांनाही विद्यार्थ्यांना शाळेत का बोलवण्यात आले ?’ अशी विचारणा करत शाळा प्रशासनालाही ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. महेंद्रगडच्या उपायुक्ता मोनिका गुप्ता यांनी सांगितले की, शाळेची मान्यता रहित करावी, यासाठी शिक्षणाधिकार्यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे.
या बसचा चालक मद्य पिऊन आला होता. याची माहिती मुख्याध्यापिकांना देण्यात आली होती. त्यावर त्यांनी ‘आजच्या दिवस त्याला बस चालवू द्या, उद्यापासून दुसरी व्यवस्था करू’, असे सांगत त्याला बस चालवण्याची अनुमती दिली होती, असे स्थानिकांकडून सांगण्यात आले.