५ लाख रुपयांची मागणी; प्राथमिक अन्वेषणामध्ये पाटील दोषी !
पुणे – फसवणुकीचा गुन्हा नोंद न करण्यासाठी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील साहाय्यक पोलीस आयुक्त (ए.सी.पी.) मुगुटलाल पाटील यांच्या सांगण्यावरून ओंकार जाधव याला १ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. यानंतर लाचलुचपच प्रतिबंधक विभागाकडून पाटील यांची चौकशी केली जाणार आहे. अटक केलेला तरुण ओंकार जाधव आणि एसीपी पाटील यांची पूर्वीपासून ओळख आहे. एका तरुणाने कात्रज-कोंढवा बाह्यवळण मार्गावरील जागेसंदर्भात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्याची मागणी अर्ज केला होता. त्याचे अन्वेषण करण्याचे दायित्व पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले होते. त्यानुसार तक्रारदारावर गुन्हा नोंद न करणे, गुन्ह्यांमध्ये साहाय्य करणे यासाठी ५ लाख रुपये लाचेची मागणी केली होती.
अन्वेषण अधिकारी पोलीस अधीक्षक नितीन जाधव यांनी सांगितले, आरोपी ओंकार याने साहाय्यक पोलीस आयुक्त पाटील यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडे ५ लाख रुपये लाचेची मागणी केली असल्याचे प्राथमिक अन्वेषणामध्ये निष्पन्न झाले आहे. अन्वेषण पूर्ण झाल्यानंतर संबंधित पाटील यांना आरोपी करायचे कि नाही, या संदर्भात निर्णय घेतला जाईल.
संपादकीय भूमिका :
|