काशी विश्‍वनाथ कॉरिडॉरच्या निर्मितीनंतर पर्यटकांच्या संख्येत वाराणसीने गोव्याला मागे टाकले !

३ वर्षांत गोव्यात १ कोटी, तर वाराणसी येथे १३ कोटी पर्यटकांनी दिली भेट ! गोवा म्हणजे ‘सन’, ‘सँड’, ‘सी’, ‘कॅसिनो’, देशी-विदेशी पर्यटक अशीच प्रतिमा सर्वत्र आहे. काशीने अवघ्या २ वर्षांत गोव्याला मागे टाकले आहे.

Sunburn Festival : ‘सनबर्न’चे गेल्या वर्षीचे आयोजन संपूर्णत: अनधिकृत ! – उच्च न्यायालय

अशा महोत्सवाच्या वेळी पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांनी उपस्थित राहून त्यावर देखरेख ठेवावी लागणार आहे. खंडपिठाने याचिकादाराला २५ सहस्र रुपये भरपाई देण्याचा ‘सनबर्न’च्या आयोजकांना आदेश दिला आहे.

Pensioners Strike Maharashtra : मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर महाराष्ट्रातील सरकारी कर्मचार्‍यांचा संप मागे !

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याविषयी अंतिम निर्णय घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.

Drug Racket : मोरजी (गोवा) येथे १ कोटी रुपये किमतीच्या अमली पदार्थांसह रशियाचा नागरिक कह्यात

अमली पदार्थविरोधी पथकाला मोरजी येथे अमली पदार्थाचा व्यवहार होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाच्या पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

पुणे येथे वाय्.सी.एम्. रुग्णालयात रुग्णांच्या देयकांच्या बनावट पावत्या बनवून ६८ सहस्र रुपयांचा अपहार !

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वाय्.सी.एम्.) रुग्णालयात वेगवेगळ्या विभागांच्या ‘कॅश काउंटर’वर (पैसे देवाण-घेवाणीसाठी केलेली व्यवस्था) नेमलेल्या कामगाराने रुग्णांच्या देयकांच्या बनावट पावत्या सिद्ध करून ६८ सहस्र रुपयांचा अपहार केला.

बनावट वधू-वर सूचक टोळीला पायबंद घालण्यासाठी मनसेचे व्यापक आंदोलन ! – सुनील सामंत

मुलींची स्थळे दाखवतो म्हणून अनेक बनावट वधू-वर सूचक मंडळे आणि दलाल तरुण, तसेच त्यांच्या कुटुंबियांना प्रतिदिन फसवत आहेत.

परशुराम आर्थिक विकास महामंडळास मंत्रीमंडळाची मान्यता !

राज्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास १४ डिसेंबरला मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विधानभवनात ही बैठक पार पडली.

श्रीरामाच्या नित्यपूजेसाठी नाशिक येथील काळाराम मंदिराचे पूजाविधान उपलब्ध ! – महंत सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर संस्थान, नाशिक

मंदिरातील पूजाविधानातील जवळपास ५० ते ६० टक्के पूजाविधान हे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पूजाविधानात समाविष्ट केले जाणार आहे.

पुण्यातील नारायणगाव येथे ८ बांगलादेशी नागरिकांना पकडले !

नारायणगाव परिसरात अवैध वास्तव्य करणार्‍या ८ बांगलादेशी नागरिकांना राज्य आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) १४ डिसेंबर या दिवशी पकडले. अवैध वास्तव्य केल्याप्रकरणी ८ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांची ए.टी.एस्.कडून चौकशी करण्यात येत आहे.

विज्ञानाची मर्यादा आणि अध्यात्माचे अलौकिकत्व !

‘विज्ञान मानवी जीवन सुखी करण्यासाठी आहे, तर अध्यात्म मानवी जीवन आनंदी करण्यासाठी आणि ईश्वरप्राप्ती करून देणारे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले