मध्‍य रेल्‍वेच्‍या ६ स्‍थानकांवर फलाट तिकीट विक्री बंद !

प्रवाशांच्‍या सुविधेसाठी सी.एस्.एम्.टी. आणि दादर येथे सायंकाळी ६ ते रात्री १२.३०, ठाणे येथे सायंकाळी ७ ते रात्री १.३०, कल्‍याण येथे सायंकाळी ६ ते रात्री १.३० वाजता, एल्.टी.टी. येथे सायंकाळी ६.३० ते रात्री १ पर्यंत आणि पनवेल येथे रात्री ११ ते २ वाजेपर्यंत फलाट तिकीट मिळणार नाही.

वायूप्रदूषणाच्‍या नियमांचा भंग केल्‍याप्रकरणी ८ सहस्र ४४५ कारवाया !

प्रदूषण रोखण्‍यासाठी आवाहन करूनही त्‍याचे पालन न करणे म्‍हणजे जनतेच्‍या असंवेदनशीलतेचे लक्षण !

महाराष्‍ट्रात ४० लाख गायी-म्‍हशी यांना वंध्‍यत्‍वाची समस्‍या !

राज्‍यातील पशूधनाची ही समस्‍या लक्षात घेऊन राज्‍यशासनाच्‍या वतीने २० नोव्‍हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत ‘राज्‍यव्‍यापी वंध्‍यत्‍व निवारण’ अभियान घेण्‍यात येणार आहे.

प्रदूषण रोखण्‍यासाठी बांधकामे १९ नोव्‍हेंबरपर्यंत बंद ठेवा ! – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्‍तांचा आदेश

सर्व बांधकामे चालू असलेल्‍या ठिकाणी दिवसा आणि रात्रीची ध्‍वनी अन् धुळीची पातळी नियंत्रित ठेवावी, अन्‍यथा प्रतिचौरस मीटर १० रुपयांप्रमाणे दंडात्‍मक कारवाईची चेतावणीही त्‍यांनी दिली आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कुर्‍हाड दाखवून दहशत माजवणारा अटकेत !; मित्राला चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण करणार्‍याला अटक !…

पादचारी, रिक्‍शाचालक यांना कुर्‍हाडीचा धाक दाखवून त्‍याने रिक्‍शाच्‍या काचा फोडल्‍या. या प्रकरणी गुन्‍हा नोंदवण्‍यात आला असून आरोपी नीलेश शिंगारे याला अटक केली आहे.

पोलीस प्रशासन हे लक्षात घेईल का ?

‘स्वतःच्या खात्यातील भ्रष्टाचार उघडकीस न आणणारे पोलीस, समाजातील भ्रष्टाचार उघडकीस आणतील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राष्‍ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्‍या अध्‍यक्षा डॉ. दिव्‍या गुप्‍ता सांगलीत येणार

राष्‍ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्‍या अध्‍यक्षा डॉ. दिव्‍या गुप्‍ता २२ नोव्‍हेंबरला सांगलीत येणार आहेत. त्‍या दिवशी सांगलीतील विविध सामाजिक संघटनांमध्‍ये काम करणार्‍या महिलांशी संवाद साधून त्‍या मार्गदर्शन करणार आहेत

राज्‍यात समूह विद्यापिठे स्‍थापन करण्‍यासाठी राज्‍यशासन प्रोत्‍साहन देणार ! – राज्‍य मंत्रीमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

राज्‍यातील शैक्षणिक संस्‍था बळकट व्‍हाव्‍यात, तसेच सर्व राज्‍यांमध्‍ये एकसमान शैक्षणिक धोरण राबवता यावे, यासाठी राज्‍यात समूह विद्यापीठे स्‍थापन करण्‍याचा निर्णय १७ नोव्‍हेंबराच्‍या राज्‍यमंत्रीमंडळाच्‍या बैठकीत घेण्‍यात आला.

१ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्‍यवस्‍थेचे उद्दिष्‍ट गाठण्‍यासाठी मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत ३४१ शिफारसी सादर !

१७ नोव्‍हेंबर या दिवशी झालेल्‍या मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत राज्‍य आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल सादर करण्‍यात आला. यामध्‍ये राज्‍याचे १ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्‍यवस्‍थेचे उद्दिष्‍ट गाठण्‍यासाठी विविध ३४१ शिफारसी आर्थिक सल्लागार परिषदेकडून सादर करण्‍यात आल्‍या.

निरागसतेमागील राष्‍ट्रघातकी चेहरा !

आतंकवादाचे समर्थन करण्‍याच्‍या माध्‍यमातून हे पर्यावरणवादी जगातील वातावरण दूषित करू पहात आहेत. अशांचे कुणाकुणाशी संबंध आहेत ? तसेच त्‍यांची मानसिकता कशी आहे ? ते जाणून घेतल्‍यासच पर्यावरणप्रेमाच्‍या निरागसतेमागील राष्‍ट्रघातकी चेहरे समोर येऊन त्‍यांचे बिंग फुटेल, हे निश्‍चित !