हिंदूंच्‍या देशात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

झारखंडधील मांडर येथे हिंदूंच्‍या ४ मंदिरांत तोडफोडीच्‍या घटना घडल्‍या. जम्‍मू-काश्‍मीरमधील पूंछ येथील शिवमंदिरात आतंकवाद्यांनी बाँबस्‍फोट केला. या प्रकरणी अहमद शेख या सरकारी शिक्षकासह अब्‍दुल रशीद आणि मेहराज अहमद या आतंकवाद्यांना अटक करण्‍यात आली.

तापामध्‍ये दही का खाऊ नये ?

दह्यामध्‍ये प्रथिने जास्‍त असतात. रोगप्रतिकारक शक्‍ती वाढण्‍यासाठी प्रथिनांचे सेवन आवश्‍यक असते’, या अर्धसत्‍य ज्ञानामुळे कोरोनाच्‍या काळात ताप असतांना अनेकांना दही खाण्‍याचा सल्ला दिला गेला. या दह्यामुळे पचनशक्‍ती मंदावून फुप्‍फुसांमध्‍ये पाणी होऊन रुग्‍ण अत्‍यवस्‍थ झाल्‍याची अनेक उदाहरणे वैद्यांच्‍या लक्षात आली.

संस्‍कृत भाषेचे सौंदर्य !

माणसाचा आदर्श !
आपद़्‍सु न त्‍यजेद़् धैर्यम् संपत्‍सुचन नम्रताम् ॥
अर्थ : संकटे आली असता मनुष्‍याने धैर्य सोडू नये आणि संपत्तीच्‍या म्‍हणजे उत्‍कर्षाच्‍या काळात नम्रता सोडू नये.

राजकीय पक्षांच्‍या निधीविषयी पारदर्शकता का नको ?

काय आहे ‘इलेक्‍टोरल बाँड व्‍यवस्‍था’ ? राजकीय पक्ष निधी उभारण्‍यासाठी जनतेला या व्‍यवस्‍थेच्‍या माध्‍यमातून आवाहन करू शकतात की, तिने राजकीय पक्षांना निधी द्यावा. हे ‘बाँड्‍स’ १ सहस्र रुपयांपासून १ कोटी रुपयांपर्यंत विकत घेता येतात. ‘स्‍टेट बँक ऑफ इंडिया’च्‍या काही शाखांमध्‍येच ही व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. हा निधी कुणाकडून आला आहे ? हे राजकीय पक्षांपासूनही गोपनीय … Read more

जीवनाचे मूल्‍य जाणा !

आत्‍महत्‍या ! सध्‍या विद्यार्थी परीक्षेच्‍या ताणाला सामोरे जाऊ शकत नाहीत. असे का होते ? सर्वकाही सहज मिळत गेल्‍याने मुलांना ‘संघर्ष काय असतो ?’, हेच ठाऊक नसते. अशी मुले जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरी जाऊ शकत नाहीत.

नरकासुर प्रतिमादहन : नरकासुर वृत्तीचा नाश की परिपोष ?

भारतीय संस्‍कृती ही मांगल्‍याचा वास असणारी अद्वैताची सुंदर संस्‍कृती ! इतर जगातील देश चंगळवादाच्‍या अशांत, बीभत्‍स आसुरी संस्‍कृतीच्‍या विळख्‍यातून सुटून शांततेचा मार्ग शोधत असतांना आज आशेचा किरण वाटणारी अशी मांगल्‍य आणि चेतना असणारी सात्त्विक संस्‍कृती असलेला देश म्‍हणजे भारत ! जगाने मांगल्‍याचा, उत्‍साहाचा, शांततेचा वारसा असलेल्‍या या देशाकडे आपला तारणहार म्‍हणून बघावे, असा लौकिक आपल्‍या भारत … Read more

…अशा विज्ञापनांवर बंदीच हवी !

ज्‍या वयात मुलांनी शालेय अभ्‍यासात लक्ष केंद्रित करावे, खेळ आणि कलागुण यांमध्‍ये कौशल्‍य प्राप्‍त करावे, त्‍या वयात ‘लॉटे चोको पाय’ प्रेमाचे चाळे करण्‍याचे आवाहनाच जणू हे विज्ञापन करत आहे.

प्रशासनाच्‍या लालफितीच्‍या कारभाराविषयी ८५ वर्षीय पित्‍याला दिलासा देणारा उत्तरप्रदेश उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

वर्ष २००७ मध्‍ये वयोवृद्ध पालकांना दिलासा देणारा कायदा बनतो; पण त्‍या कायद्यातील नियम लालफितीमध्‍ये अडकून पडतात. प्रशासनाला जागे करण्‍यासाठी लोकांना उच्‍च न्‍यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतात, हे मोठे दुर्दैव !

Diwali : पांडव पंचमी साजरी का केली जाते ?

‘पांडव पंचमी’ किंवा ‘कडपंचमी’ हा दिवाळीचा समारोपाचा दिवस. १२ बलुतेदारांनी आपल्‍या व्‍यवसायाच्‍या ठिकाणी लक्ष्मी आणि अवजारे, हत्‍यारे, उद्योग साधने यांची पूजा करण्‍याचा दिवस. दिवाळी कडेला गेली; म्‍हणून या दिवसाला ‘कडपंचमी’ असेही म्‍हणतात.

‘साधकांची आध्‍यात्मिक प्रगती व्‍हावी’, यासाठी प्रयत्न करणार्‍या आणि तळमळीने सेवा करणार्‍या ६९ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या मडगाव, गोवा येथील वास्‍तूविशारद (सौ.) शौर्या सुनील मेहता (वय ४७ वर्षे) !

उद्या ‘कार्तिक शुक्‍ल षष्‍ठी, रविवार (१९.११.२०२३) या दिवशी वास्‍तूविशारद (सौ.) शौर्या सुनील मेहता (आध्‍यात्मिक पातळी ६९ टक्‍के) यांचा ४७ वा वाढदिवस आहे.