सांगली – राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा डॉ. दिव्या गुप्ता २२ नोव्हेंबरला सांगलीत येणार आहेत. त्या दिवशी सांगलीतील विविध सामाजिक संघटनांमध्ये काम करणार्या महिलांशी संवाद साधून त्या मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती श्री. दीपक शिंदे आणि सौ. नीता केळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.