मध्‍य रेल्‍वेच्‍या ६ स्‍थानकांवर फलाट तिकीट विक्री बंद !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई दिवाळीनंतर मुंबईकडे परतीचा प्रवास करणारे आणि छटपूजेनिमित्त मुंबईबाहेर जाणार्‍यांची संख्‍या वाढली आहे. प्रवाशांना रहदारी करतांना अडचणी येत आहेत. प्रवाशांच्‍या गर्दीवर नियंत्रण मिळवण्‍यासाठी मध्‍य रेल्‍वे प्रशासनाने मुंबई विभागातील सी.एस्.एम्.टी., एल्.टी.टी., दादर, ठाणे, कल्‍याण, पनवेल या रेल्‍वेस्‍थानकांवर २४ नोव्‍हेंबरपर्यंत प्रतिदिन काही घंट्यांंसाठी फलाट तिकीट विक्री बंद करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांच्‍या सुविधेसाठी सी.एस्.एम्.टी. आणि दादर येथे सायंकाळी ६ ते रात्री १२.३०, ठाणे येथे सायंकाळी ७ ते रात्री १.३०, कल्‍याण येथे सायंकाळी ६ ते रात्री १.३० वाजता, एल्.टी.टी. येथे सायंकाळी ६.३० ते रात्री १ पर्यंत आणि पनवेल येथे रात्री ११ ते २ वाजेपर्यंत फलाट तिकीट मिळणार नाही. या निर्बंधांमधून ज्‍येष्‍ठ नागरिक, दिव्‍यांग (अपंग) व्‍यक्‍ती, लहान मुले आणि महिला प्रवाशांसमवेत स्‍थानकावर येणार्‍या एका व्‍यक्‍तीला फलाट तिकीट मिळणार आहे, अशी माहिती मध्‍य रेल्‍वेच्‍या एका अधिकार्‍याने दिली.