साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर स्वत:वरील अत्याचार कथन करत असतांना झाल्या भावूक !

मालेगाव स्फोटप्रकरणी भोपाळ न्यायालयात चालू आहे सुनावणी !
न्यायाधिशांनी १० मिनिटांसाठी रोखले न्यायालयाचे कामकाज !

बिहारनंतर आता झारखंड सरकारही जातीनिहाय जनगणना जारी करण्याची शक्यता !

अशा प्रकारच्या जनगणनेच्या माध्यमातून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे कुटील षड्यंत्र रचण्यात आले आहे. हिंदूंच्या विरोधातील हिंदुद्वेष्ट्या राजकीय पक्षांचे हे कटकारस्थान उलथवून लावण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन हाच एकमेव पर्याय आहे !

हिंदवी स्वराज्याच्या पराक्रमाचा इतिहास महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोचणार !

महाराष्ट्र शासनाचा अभिनंदनीय निर्णय !

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचे रूपांतर आपल्याला रामराज्यात करायचे आहे ! – अभय जगताप

आजचा दिवस दसरा-दिवाळीसारखा उत्साहाचा दिसतो, ही किमया छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आजपर्यंत देशावर अनेक आक्रमणे झाली. परकीय आक्रमकांना केवळ देशच लुटायचा नव्हता; तर देशातील धर्म, संस्कृती आणि धर्मनिष्ठ समाजजीवन नष्ट करायचे होते.

गोवा : ३ अल्पवयीन मुलांकडे १२ लाख रुपये किमतीचा गांजा सापडला

ही तिन्ही मुले बिहारची आहेत. ही मुले एका पॉलिथीन पिशवीत १२ किलो गांजा घेऊन ग्राहकांच्या शोधात फिरत होती. अल्पवयीन मुलांचा कुणालाही संशय येणार नाही, यासाठी त्यांचा अमली पदार्थ व्यावसायिक वापर करतात.

सर्व राजकीय पक्षांनी हिंदुत्‍वाचा स्‍वीकार केल्‍यास वाद संपेल ! – मिलिंद परांडे, राष्‍ट्रीय महामंत्री, विहिंप

सर्व राजकीय पक्षांनी हिंदुत्‍वाचा स्‍वीकार केला, तर वादाचे सूत्रच उरणार नाही, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे राष्‍ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी २ ऑक्‍टोबर या दिवशी व्‍यक्‍त केले. येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

देहली, उत्तरप्रदेश आणि हरियाणा येथे भूकंप !

राजधानी देहलीसह उत्तरप्रदेश आणि हरियाणा या राज्‍यांमध्‍ये ३ ऑक्‍टोबर या दिवशी भूकंपाचे धक्‍के जाणवले. देहली-एन्.सी.आर्. या भागात दुपारी २ वाजून ५३ मिनिटांनी झालेल्‍या भूकंपाची रिश्‍टर स्‍केलवर ४.६ इतकी तीव्रता नोंदवली.

१ सहस्र मुलांच्‍या दातांना कीड लागल्‍याने प्रतिदिन भरावे लागते सिमेंट !

शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्‍णालयाच्‍या अधिष्‍ठाता डॉ. माया इंदूरकर म्‍हणाल्‍या की, दातांची योग्‍य ती काळजी घेण्‍यासमवेत दातांना कीड लागू नये किंवा दात मजबूत ठेवण्‍यासाठी लहान मुलांना प्रतिदिन फळे आणि पालेभाज्‍या खाण्‍यास द्याव्‍यात.

सिंधुदुर्ग : तुळसुली येथील शैक्षणिक संस्थेत २१ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणी कनिष्ठ लिपिकावर गुन्हा नोंद !

तुळसुली येथील लिंगेश्वर माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय चालवणार्‍या तुळसुली ऐक्यवर्धक संघ या संस्थेच्या बचत खात्यातील रकमेचा अपहार केल्याच्या प्रकरणी मुकुंद आत्माराम वारंग यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पाचगाव (जिल्‍हा नागूपर) येथे रिसॉर्टवरील धाडीत अश्‍लील नृत्‍य करणार्‍या १३ तरुणी कह्यात !

अश्‍लील नृत्‍यासाठी पूरक ठरणार्‍या अशा संबंधितांवर कठोर कारवाई कधी होणार ?