गोवा : ३ अल्पवयीन मुलांकडे १२ लाख रुपये किमतीचा गांजा सापडला

अमली पदार्थ व्यवसायासाठी अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचे पुन्हा एकदा उघड

पणजी, ३ ऑक्टोबर (वार्ता.) : अमली पदार्थ व्यवसायासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने शिरसई बसस्थानकावर सापळा रचून अमली पदार्थ व्यवसायात गुंतलेल्या ३ अल्पवयीन मुलांना कह्यात घेतले. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी मुलांकडील पिशवीची झडती घेतली असता पिशवीमध्ये १२ लाख रुपये किमतीचा १२ किलो गांजा सापडला.

उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार ही तिन्ही मुले बिहारची आहेत. ही मुले एका पॉलिथीन पिशवीत १२ किलो गांजा घेऊन ग्राहकांच्या शोधात फिरत होती. अल्पवयीन मुलांचा कुणालाही संशय येणार नाही, यासाठी त्यांचा अमली पदार्थ व्यावसायिक वापर करतात.’’