नवी देहली – राजधानी देहलीसह उत्तरप्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये ३ ऑक्टोबर या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले. देहली-एन्.सी.आर्. या भागात दुपारी २ वाजून ५३ मिनिटांनी झालेल्या भूकंपाची रिश्टर स्केलवर ४.६ इतकी तीव्रता नोंदवली. उत्तरप्रदेशात भूकंपाचे धक्के जाणवले. हरियाणातील काही जिल्ह्यांतही भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी ११ वाजून ०६ मिनिटांनी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू सोनिपत येथे, तर काहींचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. नेपाळमध्ये दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी ४.६ रिश्टर स्केलचा पहिला, तर २ वाजून ५३ मिनिटांनी ६.२ रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप झाला. अनेक घरांची पडझड झाली.
दिल्ली-NCR, उत्तर प्रदेश और उत्तराखंड में भूकंप के तेज झटके#Delhi #uttarpradesh #uttarakhand #ghaziabad #lucknow #earthquake #Newsindia@DeepikasinghJ @NamitTyagii pic.twitter.com/yJVdgvXDDy
— News India (@newsindia24x7_) October 3, 2023