चॉकलेट आणि गोड पदार्थ यांच्या अतीसेवनाचा परिणाम !
छत्रपती संभाजीनगर – चॉकलेट आणि गोड पदार्थ खाल्ल्याने लहान मुलांच्या दातांना कीड लागण्याचे प्रमाण वाढले आहे. १ सहस्र लहान मुलांच्या दातांना कीड लागल्यानंतर ती थांबवण्यासाठी दातांमधील बॅक्टेरिया (विषाणू) काढून घेत छिद्र बुजवण्यासाठी सिमेंट किंवा चांदी भरावी लागते. नियमित दात न घासल्याने दातांना कीड लागते. त्यामुळे लहान मुलांना वारंवार चॉकलेट, गोड पदार्थ, फास्ट फूड, चिप्स, कुरकुरे खाण्यास देऊ नये. असे पदार्थ खाल्ल्यानंतर पाण्याने गुळणी करावी. २ वेळा नियमित दात घासावेत, अशी माहिती दंततज्ञ समृद्धी शिंदे यांनी दिली.
शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. माया इंदूरकर म्हणाल्या की, दातांची योग्य ती काळजी घेण्यासमवेत दातांना कीड लागू नये किंवा दात मजबूत ठेवण्यासाठी लहान मुलांना प्रतिदिन फळे आणि पालेभाज्या खाण्यास द्याव्यात.
संपादकीय भूमिकापालकांनो, ‘फास्ट फूड’ देऊन नव्हे, तर फळे आणि पालेभाज्या देऊन आपल्या मुलांच्या दातांची निगा राखा ! |