सर्व राजकीय पक्षांनी हिंदुत्‍वाचा स्‍वीकार केल्‍यास वाद संपेल ! – मिलिंद परांडे, राष्‍ट्रीय महामंत्री, विहिंप

विहिंपचे राष्‍ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे

नागपूर – सर्व राजकीय पक्षांनी हिंदुत्‍वाचा स्‍वीकार केला, तर वादाचे सूत्रच उरणार नाही, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे राष्‍ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी २ ऑक्‍टोबर या दिवशी व्‍यक्‍त केले. येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

ते पुढे म्‍हणाले की, काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी यांनी ‘सत्‍यम् शिवम् सुंदरम्’ असे ट्‍वीट करत हिंदु धर्माची प्रशंसा केली आहे. ते काही गोष्‍टींवर प्रथमच स्‍पष्‍ट बोलले आहेत. हा चांगला प्रारंभ आहे. सर्व राजकीय पक्षांनी हिंदुत्‍वाला आपले व्‍यासपीठ केले, तर वादाचे सूत्र उरणार नाही. जगाला हिंदु विचारसरणीच्‍या जवळ यावे लागेल; कारण हिंदु समाजाची विचारसरणी सकारात्‍मक आहे. एक दिवस हे जगाला मान्‍य करावे लागेल; तसे होईल, तो सुदिन राहील. सध्‍या ते घडत आहे, ही आनंदाची गोष्‍ट आहे. अधिकाधिक लोकांनी त्‍यात सहभागी व्‍हावे.