नांदेड, संभाजीनगर येथील रुग्‍णांच्‍या मृत्‍यूचा सविस्‍तर अहवाल केंद्र सरकारने मागवला !

चुकीच्‍या पद्धतीने वैद्यकीय महाविद्यालय चालत असेल, तर कारवाई केली जाते. जिथे सुविधा नसतील, अशा वैद्यकीय महाविद्यालयाला अनुमती दिली जाणार नाही, असा निर्णय घेण्‍यात आला आहे.

सिंधुदुर्ग : गौतमी पाटील यांचे जिल्ह्यातील नृत्याचे कार्यक्रम रहित

आयोजकांनी काही कारणांमुळे कार्यक्रम रहित केल्याचे म्हटले असले, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांकडून या अनैतिक कार्यक्रमांना झालेल्या विरोधामुळेच हे कार्यक्रम रहित करावे लागले, अशी चर्चा जिल्ह्यात चालू होती !

पुणे येथे रस्‍त्‍यावर उभारलेले मंडप न काढणार्‍या मंडळांना क्षेत्रीय कार्यालयांकडून नोटीस !

अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्‍त माधव जगताप म्‍हणाले की, ‘‘२२ मंडळांनी रनिंग (रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला खांब उभे करून त्‍यावर रंगीत झालर (कापड) लावणे) मंडप काढण्‍यास विलंब केल्‍याने महापालिकेने त्‍यावर कारवाई केली आहे.

नांदेड प्रकरणात दोषींवर कारवाई केली जाईल ! – हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री

यापूर्वीच्‍या अनेक प्रकरणांमध्‍ये रुग्‍णांचा मृत्‍यू झाल्‍यावर सरकार अन्‍वेषणाचे आदेश देते, अन्‍वेषण समित्‍या नेमल्‍या जातात; मात्र त्‍यांचे पुढे काय झाले ? किती जणांवर कारवाई झाली ? हे कधीच समोर येत नाही.

हत्‍येच्‍या गुन्‍ह्यातील पसार आरोपीस ३६ वर्षांनी पकडले !

आरोपींना पकडण्‍यास एवढी वर्षे का लागतात ? याचा अभ्‍यास पोलीस करतील का ?

लोणावळा (जिल्‍हा पुणे) येथे पर्यटक अल्‍पवयीन मुलींचे अपहरण करून सामूहिक बलात्‍कार !

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या महाराष्‍ट्रात अशा घटना घडणे लज्‍जास्‍पद आहे ! यातून पोलिसांचा गुन्‍हेगारांना काहीच धाक उरला नाही, हे सिद्ध होते.

महाराष्‍ट्र सरकार प्रतिवर्षी २७ अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थ्‍यांना परदेशातील शिक्षणासाठी शिष्‍यवृत्ती देणार !

‘अल्‍पसंख्‍यांक’ म्‍हणून किती वर्षे सवलती देणार ? याविषयी केंद्र सरकारने धोरण निश्‍चित करायला हवे !

पोलिसांनी गुन्‍हा नोंदवतांना कठोर कलमे न लावल्‍याने हिंदुत्‍वनिष्‍ठ संतप्‍त !

हिंदुत्‍वनिष्‍ठांनो, संतप्‍त होऊन थांबू नका, तर संबंधित धर्मांधांवर कठोर कलमे लावण्‍यासाठी पोलीस प्रशासनाचा पाठपुरावा घ्‍या आणि राष्‍ट्रकर्तव्‍य पार पाडा !

कुठे राष्ट्रप्रमुख, तर कुठे ऋषीमुनी !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या किती राष्ट्रपतींची आणि पंतप्रधानांची नावे किती जणांना ज्ञात आहेत ? याउलट ऋषीमुनींची नावे सहस्रो वर्षे ज्ञात आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘भारतीय वायू सेना’दिनानिमित्त सुभेदार मेजर संजय कुमार यांचा सत्‍कार !

९१ व्‍या ‘भारतीय वायू सेना’दिना निमित्त ‘डिफेन्‍स फोर्स लीग’कडून आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात ‘परमवीर चक्र’ पुरस्‍काराने सन्‍मानित सुभेदार मेजर संजय कुमार यांचा सत्‍कार करण्‍यात आला.