|
भोपाळ – येथील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या ३ ऑक्टोबर या दिवशी मालेगाव स्फोट प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी भावूक झाल्या. सुनावणीच्या वेळी त्या त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती देत होत्या. त्या भावुक झाल्याचे पाहून न्यायाधीश लाहोटी यांनी १० मिनिटे न्यायालयाचे कामकाज रोखले. साध्वी सामान्य स्थितीत आल्यावर न्यायाधिशांनी सुनावणी पुन्हा चालू केली.
जिस साध्वी को चमड़े के बेल्ट से पीटा, पुरुष कैदियों के साथ रख पोर्न वीडियो देखने को किया मजबूर, वह कोर्ट में हुईं भावुक: जानिए मामला#SadhviPragya #ColonelPurohithttps://t.co/1X6P7HRpCM
— ऑपइंडिया (@OpIndia_in) October 4, 2023
न्यायालयात साध्वींना ६० प्रश्न विचारण्यात आले. साध्वी प्रज्ञासिंह यांना जेव्हा बाँबस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या आणि घायाळ लोकांना झालेल्या जखमांविषयी विचारण्यात आले, तेव्हा त्या भावुक झाल्या. त्या म्हणाल्या की, अटक करण्यात आल्यावर मला सतत पुष्कळ शिवीगाळ करण्यात येत असे. पुरुष कैद्यांसमवेत ठेवून अश्लील व्हिडिओ पहायला मला बाध्य केले जाई. मला मारहाण करण्यासाठी ५-६ पोलीस ठेवले जात. ते दमले की, अन्य पोलीस येऊन मला मारहाण करत.
महाराष्ट्रातील मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ या दिवशी झालेल्या स्फोटात ९ लोकांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक जण घायाळ झाले होते. बाँबस्फोटामध्ये साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह काही हिंदुत्वनिष्ठांना आरोपी म्हणून गोवण्यात आले होते. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या वर्ष २०१६ मध्ये प्रविष्ट आरोपपत्रात साध्वींवर कोणतेच आरोप ठेवण्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांना जामीन संमत झाला.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या साधू-संतांवरील अनन्वित अत्याचारांचे आजच्या काळातील सर्वांत जिवंत उदाहरण म्हणजे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर ! हिंदुद्वेष्टी काँग्रेसच या सर्वांमागील सूत्रधार असल्याने हिंदू तिला कधीच विसरणार नाहीत आणि क्षमाही करणार नाहीत ! |