सर्वच क्षेत्रांतील अन्यायाविरुद्ध आवाज उठवा !

‘राष्ट्र-धर्माभिमान्यांनो, फक्त स्वतःच्या क्षेत्रातीलच नको, तर व्यापक होण्यासाठी वैद्यकीय, न्यायालयीन, पोलीस, सरकारी कार्यालये इत्यादी सर्वच क्षेत्रांतील अन्याय शोधून त्याविरुद्ध वैध मार्गाने आवाज उठवा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

चंद्रपूर-गडचिरोली जिल्‍ह्यांतील युवकांना राज्‍यशासन देणार वैमानिक प्रशिक्षण !

अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय आणि आदिवासी समाजातील मुलांना वैमानिक होता यावे, यासाठी गडचिरोली अन् चंद्रपूर येथील युवकांना वैमानिक होण्‍याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

कारखाना माझ्‍या कह्यात मिळाला पाहिजे ! – शालिनीताई पाटील, संस्‍थापिका अध्‍यक्षा, जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखाना

जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्‍याची किंमत १०४ कोटी रुपये असतांना हा कारखाना कवडीमोल भावात विकण्‍यात आला असून यात अनधिकृत आर्थिक व्‍यवहार झाला आहे. या व्‍यवहाराला आव्‍हान देणारी याचिका उच्‍च न्‍यायालयात प्रविष्‍ट केली आहे.

खासगी ट्रॅव्‍हल्‍सच्‍या विरोधातील तक्रारीसाठी स्‍वतंत्र ‘हेल्‍पलाईन’ क्रमांक द्यावा !

बसस्‍थानके, खासगी ट्रॅव्‍हल्‍स आणि त्‍यांची तिकीट विक्री केंद्रे यांवर तक्रारीसाठी असलेला ‘हेल्‍पलाईन’ क्रमांक ठळकपणे लावण्‍यात यावा. ‘ट्‍विटर’, ‘फेसबूक’ आदी सामाजिक माध्‍यमांद्वारे याविषयी जागृती करावी’, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.

राज्‍यभरात दहीहंडीचा कार्यक्रम उत्‍साहात साजरा !

‘गोविंदा रे गोपाळा’, ‘आला रे आला गोविंदा आला’, या गोविंदाची गाण्‍यांच्‍या तालावर राज्‍यभरात दहीहंडीचा कार्यक्रम उत्‍साहात पार पडला. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांनी दहीहंडीचे आयोजन केले होते.

‘भारत’ नाव करण्याचा प्रस्ताव आला, तर विचार करू ! – संयुक्त राष्ट्रे

राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्याकडून ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ असा करण्यात येत असलेला उल्लेख पहाता जनतेतूनही याची मागणी होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर संयुक्त राष्ट्रांकडूनही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे

भारतीय बनावटीच्‍या खेळण्‍यांच्‍या ‘इंडियन टॉईज मेला डॉट कॉम’ संकेतस्‍थळाचे सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍या हस्‍ते उद़्‍घाटन !

‘टॉय अँटीका (ओपिसी) प्रा.लि.’ या आस्‍थापनाच्‍या वतीने चालू करण्‍यात आलेल्‍या ‘इंडियन टॉईज मेला डॉट कॉम’ (indiantoysmela.com) या संकेतस्‍थळाचे उद़्‍घाटन ७ सप्‍टेंबर २०२३ या दिवशी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

हिंदुद्वेषी ‘एडिटर्स गिल्‍ड’ !

‘एडिटर्स गिल्‍ड ऑफ इंडिया’चा हिंदुविरोधी तोंडवळा जगापुढे आला आहे. त्‍यामुळे सरकारने या प्रकरणी आता मागे न हटता सातत्‍याने दुतोंडी भूमिका घेणार्‍या ‘एडिटर्स गिल्‍ड’ची पाळेमुळे खणून ‘तिच्‍या मागे कोण आहे ?’, ‘त्‍याला कोण पैसा पुरवते ?’, याची सत्‍यता जनतेसमोर मांडून हिंदुविरोधी पत्रकारितेला चाप लावावा !

वीजचोरी करणार्‍या ८ जणांविरुद्ध गुन्‍हा नोंद !

वीजचोरी करणार्‍यांना कठोर शिक्षा होत नसल्‍यामुळेच असे धाडस केले जाते !

जळगाव येथील तरुणीचा व्‍हिडिओ काढणार्‍या धर्मांधाला चोप !

तरुणीचे चोरून व्‍हिडिओ काढून तिची फसवणूक करण्‍याचा धर्मांधाचा धूर्त डाव ओळखून त्‍याच्‍यावर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे !