‘भारत’ नाव करण्याचा प्रस्ताव आला, तर विचार करू ! – संयुक्त राष्ट्रे

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांचे उप प्रवक्ता फरहान हक

नवी देहली – देशाचे अधिकृत नाव केवळ ‘भारत’ करण्याची चर्चा देशात चालू झाली आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्याकडून ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ असा करण्यात येत असलेला उल्लेख पहाता जनतेतूनही याची मागणी होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर संयुक्त राष्ट्रांकडूनही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. ‘जर संयुक्त राष्ट्रांमध्ये ‘भारत’ नाव करण्याविषयी प्रस्ताव आला, तर आम्ही यावर विचार करू’, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांचे उप प्रवक्ता फरहान हक यांनी म्हटले आहे.

सौजन्य: Zee News

त्यांना या संदर्भात पत्रकारांकडून प्रश्‍न विचारण्यात आला होता. या वेळी हक यांनी ‘तुर्कस्थानने ‘तुर्कीए’ नाव करण्याची संयुक्त राष्ट्रांकडे मागणी केल्यावर आम्ही त्याला संमती दिली होती’, असेही सांगितले.