सरकार सणांच्या नाही, तर कोरोनाच्या विरोधात ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत, याची मला जाणीव आहे; पण गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे.

सरकारने मंदिरे लवकर उघडली नाहीत, तर मंदिराबाहेर घंटानाद करू ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

राज ठाकरे म्हणाले, ‘‘सरकारला जनआशीर्वाद यात्रा चालते; पण सण साजरे करायला बंदी घातली आहे. कोरोना काय केवळ सणांमध्ये पसरतो का ? राजकीय यात्रांमध्ये कोरोना होत नाही का ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहीहंडी उत्सव साधेपणाने साजरा

दहीहंडी उत्सव यावर्षी कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे साधेपणाने साजरा करण्यात आला.

कोरोनाविषयीचे नियम पाळून दहीहंडी उत्सव साजरा करण्याला अनुमती द्यावी ! – आशिष शेलार, भाजप

आशिष शेलार म्हणाले, ‘‘कोरोनाचे नियम पाळून उत्सवाला अनुमती देण्याची विनंती गोविंदा पथकाकडून करण्यात आली होती; मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही विनंती नाकारली. यातून महाविकास आघाडी सरकार तालिबानी संस्कृतीचा परिचय देत आहे का ?

राज्य सरकारकडून दहीहंडीसाठी अनुमती नाही !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, एकदा अनुमती दिली आणि कोरोनाचा संसर्ग वाढला, तर उत्सव आणि संस्कृती यांना गालबोट लागेल. आम्ही गोविंदा पथकांवर कसे लक्ष ठेवणार ?