श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुणे शहरातील मुख्‍य रस्‍ते वाहतुकीसाठी बंद !

वाहतूक पोलीस मुख्‍य विसर्जन मिरवणूक मार्गांसह परिसरातील इतर १७ रस्‍ते सर्व प्रकारच्‍या वाहतुकींसाठी सकाळी ७ वाजल्‍यापासून बंद ठेवणार आहेत, तर १० ठिकाणची वाहतूक इतर रस्‍त्‍यांना वळवण्‍यात आली आहे.

पुणे येथील ‘दगडूशेठ हलवाई गणपती’चे जगभरातून ५६ लाख गणेशभक्‍तांनी घेतले ‘ऑनलाईन’ दर्शन !

ट्रस्‍टचे अधिकृत संकेतस्‍थळ, ‘फेसबुक’, ‘युट्युब’, तसेच इतर सामाजिक माध्‍यमांच्‍या सहाय्‍याने ५६ लाखांहून अधिक गणेशभक्‍तांनी ‘दगडूशेठ गणपती’चे दर्शन घेतले.

भारताची आत्‍मनिर्भर शस्‍त्रसज्‍जता हे सामर्थ्‍याचे लक्षण ! – काशिनाथ देवधर, ज्‍येष्‍ठ शास्‍त्रज्ञ

जनता बँक कर्मचारी सांस्‍कृतिक मंडळा’च्‍या ४७ व्‍या वर्षांच्‍या व्‍याख्‍यानमालेचे शिवस्‍मारक सभागृहात आयोजन करण्‍यात आले आहे. या व्‍याख्‍यानमालेच्‍या तिसर्‍या दिवशी म्‍हणजे २६ सप्‍टेंबरला ते बोलत होते.

‘डीजे’च्‍या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्‍यू !

डीजे’सारखी मोठा आवाज करणारी ध्‍वनीयंत्रणा वापरून आपणच उत्‍सवांचे पावित्र्य नष्‍ट करत आहोत, हेही मंडळांनी लक्षात घेतले पाहिजे. त्‍याही पुढे जाऊन अशातून झालेल्‍या तरुणाच्‍या मृत्‍यूचे दायित्‍व आता कोण घेणार ?

लोणावळा (पुणे) येथे हवाई दल तळ परिसरात ‘ड्रोन’द्वारे चित्रीकरण करणार्‍या तिघांवर गुन्‍हा नोंद !

लोणावळ्‍यातील ‘लायन्‍स पॉईंट’ परिसरात हवाई दलाचे तळ, नौदलाची ‘आय.एन्.एस्. शिवाजी संस्‍था’, तसेच महत्त्वाच्‍या सैन्‍य संस्‍था आहेत. त्‍यामुळे या परिसरात ‘ड्रोन कॅमेर्‍यां’द्वारे चित्रीकरण करण्‍यास प्रतिबंध करण्‍यात आला आहे.

आज विदर्भवाद्यांकडून ‘नागपूर करारा’ची होळी !

विदर्भ राज्‍य आंदोलन समितीने ‘विदर्भ मिळवू औंदा’ या कार्यक्रमाअंतर्गत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत स्‍वतंत्र विदर्भ मिळवण्‍यासाठी ‘करू किंवा मरू किंवा कारागृहात सडू’, अशी घोषणा केली आहे.

नाशिक येथे घरात झालेल्‍या भीषण स्‍फोटात ३ जण घायाळ 

नाशिक शहरातील सिडको परिसरातील एका घरात डिओड्रंटमुळे (दुर्गंधीनाशकामुळे) भीषण स्‍फोट झाल्‍याचे म्‍हटले जात आहे. यात घरातील ३ जण गंभीर घायाळ झाले असून घर आणि वाहने यांच्‍या काचाही फुटल्‍या. या प्रकरणी अन्‍वेषण चालू असून घायाळांना रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले आहे.

 भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष जे.पी. नड्डा आरती करत असतांनाच पुण्‍यातील मंदिराच्‍या कळसाला फटाक्‍यांमुळे लागली आग !

भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष जे.पी. नड्डा पुणे दौर्‍यावर असतांना एक मोठी दुर्घटना टळली. पुण्‍यातील साने गुरुजी तरुण मंडळात बाप्‍पाची आरती करण्‍यासाठी २६ सप्‍टेंबर या दिवशी जे.पी. नड्डा आले होते; मात्र त्‍याच वेळी गणेश मंडळाने साकारलेल्‍या महाकाल मंदिराच्‍या देखाव्‍याला आग लागली.

ʻविचारस्‍वातंत्र्यʼ म्हणजे काय नाही, हे लक्षात घ्या !

‘विचारस्‍वातंत्र्य म्‍हणजे दुसर्‍याला दुखवायचे किंवा धर्माच्‍या विरुद्ध बोलायचे स्‍वातंत्र्य नाही’, हेही स्‍वातंत्र्यापासून गेली ७६ वर्षे भारतावर राज्‍य करणार्‍या एकाही राजकीय पक्षाच्‍या लक्षात आले नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले