प्रतिबंध असतांनाही चित्रीकरण करणार्या संबंधित आरोपींची कसून चौकशी व्हायला हवी !
पुणे – लोणावळ्यातील ‘लायन्स पॉईंट’ परिसरात हवाई दलाचे तळ, नौदलाची ‘आय.एन्.एस्. शिवाजी संस्था’, तसेच महत्त्वाच्या सैन्य संस्था आहेत. त्यामुळे या परिसरात ‘ड्रोन कॅमेर्यां’द्वारे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हवाई दलानेही याविषयीचे फलक लावले आहेत. असे असतांनाही परिसरात ‘ड्रोन कॅमेर्यां’द्वारे चित्रीकरण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांच्याकडून ‘ड्रोन कॅमेरा’ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील कह्यात घेण्यात आलेले तिघेजण मूळचे भाग्यनगरचे आहेत. बालकृष्ण मुन्था, के. दिनेश आनंद, तनिष श्रीनिवास राव अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या परिसरात चित्रीकरण करण्यात येत असल्याची माहिती हवाई दलाच्या अधिकार्यांना मिळाली. त्यानंतर हवाई दलातील वरिष्ठ अधिकार्यांनी लोणावळा शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.