निवडणुकीत महिलांना ३३ टक्‍के आरक्षण द्या ! – लोकराज्‍य जनता पक्ष

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून महिलांना ३३ टक्‍के आरक्षणाचे धोरण लागू करावे, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्‍हाधिकारी संजय तेली यांना ‘लोकराज्‍य जनता पक्षा’च्‍या वतीने देण्‍यात आले.

नालासोपारा येथे धर्मांधाकडून १ लाख ८० सहस्र रुपयांची ब्राऊन शुगर हस्‍तगत !

अमली पदार्थांच्‍या विक्रीतून समाजाला व्‍यसनाधीन करणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षाच व्‍हायला हवी !

१ ऑक्‍टोबर या दिवशी राज्‍यात राबवणार ‘स्‍वच्‍छतेसाठी एक तारीख-एक घंटा’ उपक्रम ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

१ ऑक्‍टोबर या दिवशी  प्रत्‍येकाने स्‍वत:चा १ घंटा स्‍वच्‍छतेसाठी द्यावा. राज्‍यात १५ डिसेंबरपर्यंत ‘मुख्‍यमंत्री सक्षम शहर स्‍पर्धा’ आणि ‘मुख्‍यमंत्री सक्षम वॉर्ड स्‍पर्धा’ राबवण्‍यात येणार आहे. लोकसहभागातून अभियान यशस्‍वी करावे, असे आवाहन या वेळी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मनोज जरांगे पाटील यांच्‍याकडून सरकारला ४० दिवसांची समयमर्यादा !

‘आरक्षण घेतल्‍याविना शांत बसणार नाही. गिरीश महाजन यांनी आम्‍हाला ‘सरसकट मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देतो’, असे सांगितले आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील ‘रिंग रोड’साठी सक्‍तीने भूसंपादन करण्‍याचा जिल्‍हा प्रशासनाचा निर्णय !

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूककोंडी अल्‍प करण्‍यासाठी १७२ कि.मी. लांबीच्‍या आणि ११० मीटर रुंदीच्‍या ‘रिंग रोड’चे काम महामंडळाकडून करण्‍यात येत आहे. पूर्व आणि पश्‍चिम अशा २ टप्‍प्‍यांत रस्‍त्‍याचे काम करण्‍यात येणार आहे.

‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘धाराशिव’ नामांतराच्‍या विरोधात मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका !

यापूर्वी झालेल्‍या सुनावणीच्‍या वेळी राज्‍य सरकारकडून नामांतराविषयीच्‍या आक्षेपांची पडताळणी झाली नसल्‍याचे सांगितले होते. यावर न्‍यायालयाने ‘पडताळणी झाली नसतांना नामांतर कसे करण्‍यात आले ?’, असा प्रश्‍न उपस्‍थित केला होता.

नागपूरच्‍या पूरस्‍थितीला उत्तरदायी कोण ?

‘निसर्गाचा कोप म्‍हणायचा ? कि नियोजनशून्‍यतेचा शाप ?’ नदीपट्ट्यांतील बांधकामांना बंदी, नैसर्गिक नाले चालू करणे आणि अनधिकृत बांधकामे अन् अतिक्रमणे कायमची हटवल्‍यानंतरच पावसाळ्‍यातील नैसर्गिक आपत्तीतून नागरिकांची सुटका होणार आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी सातारा शहरातील अंतर्गत वाहतूक व्‍यवस्‍थेत तात्‍पुरता पालट !

शहरातील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी अंतर्गत वाहतूक व्‍यवस्‍थेत तात्‍पुरता पालट करण्‍यात आला आहे. २७ आणि २८ सप्‍टेंबर या दिवसांसाठी हे पालट असणार आहेत, अशी माहिती सातारा पोलीस दलाच्‍या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

‘गंगावेस ते पंचगंगा नदी’ हा मिरवणूक मार्ग चालू करावा ! – किशोर घाटगे, शिवसेना, उपजिल्‍हाप्रमुख

श्री. घाटगे यांनी पत्रकात म्‍हटले आहे की, २१ फुटी किंवा त्‍यापेक्षा अधिक मोठ्या मूर्तींचे इराणी खणीत विसर्जन करावे. प्रशासनाने जनभावनेचा आदर करावा आणि त्‍याचसमवेत पंचगंगा घाटावर युद्धपातळीवर सुविधा उपलब्‍ध करून द्याव्‍यात.

देशद्रोही खलिस्‍तान्‍यांना ओळखा !

कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांनी खलिस्‍तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्‍जर याच्‍या हत्‍येच्‍या प्रकरणी भारतावर आरोप केले आहेत. या आरोपांचे पंजाबमधील शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीने समर्थन केले आहे. तिने या संदर्भात एक प्रस्‍ताव संमत केला आहे.