पुणे – शहरातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी ‘ऑनलाईन’ सुविधा करण्यात आली होती. ट्रस्टचे अधिकृत संकेतस्थळ, ‘फेसबुक’, ‘युट्युब’, तसेच इतर सामाजिक माध्यमांच्या सहाय्याने ५६ लाखांहून अधिक गणेशभक्तांनी ‘दगडूशेठ गणपती’चे दर्शन घेतले. यात नेपाळ, अमेरिका, थायलँड, कॅनडा, इंडोनेशिया, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया आदी देशांतील नागरिकांचा सहभाग आहे.
भारतातील मुंबई, देहली, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, ठाणे, गुजरात राज्यातील सूरत, कर्णावती या शहरांतील गणेशभक्तांनी ‘ऑनलाईन’ दर्शन घेतले. ‘फेसबुक’वरून ३४ लाख ६९ सहस्र, ‘इंस्टाग्राम’वरून २१ लाख ७७ सहस्र, तर ‘यूट्युब’च्या माध्यमातून १८ सहस्र गणेशभक्तांनी याचा लाभ घेतला आहे.