काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीच्‍या बैठकीचे यजमानपद उद्धव ठाकरे यांच्‍याकडे !

इंडिया’च्‍या बैठकीच्‍या आयोजनाच्‍या पार्श्‍वभूमीवर ६ ऑगस्‍ट या दिवशी नेहरू सेंटर येथे बैठक पार पडली. याविषयी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आमच्‍यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार महत्त्वाचे नेते आहेत.

शेतकर्‍यांच्या हितासाठी राज्यशासनाने विमा योजना लागू करावी ! – खासदार उदयनराजे भोसले

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकर्‍यांच्या हितासाठी विमा योजना लागू करावी, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे, तसेच शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय उपचार नागरिकांना विनामूल्य करण्याच्या मागणीस मान्यता दिल्याने ….

(म्हणे) ‘केवळ गरीब मुसलमानांना केले जात आहे लक्ष्य !’- खासदार असदुद्दीन ओवैसी

हिंदूंना लक्ष्य करतांना याच मुसलमानांची गरिबी कुठे गेली होती, यावर ओवैसी कधीच काही बोलणार नाहीत, हे साहजिक आहे !

नूंह (हरियाणा) येथे हिंदूंच्या यात्रेवर दगडफेक करण्यात अग्रेसर असलेल्या ‘हॉटेल सहारा’वरही बुलडोझर !

हिंदूंच्या यात्रेवर धर्मांध मुसलमानांनी सर्वांत आधी तिरंगा चौकातील ‘हॉटेल सहारा’च्या गच्चीवरून आक्रमण करण्यास आरंभ केला होता.हरियाणा पोलिसांनी आता या इमारतीवर बुलडोझर चालवत सर्व मजले पाडले आहेत.

१०४ वाहनचालकांपैकी ७४ जणांची दृष्‍टी सदोष !

पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्‍या माध्‍यमातून तळोजा ब्रेक टेस्‍टिंग ट्रॅक येथे ‘रस्‍ता सुरक्षा अभियाना’च्‍या अंतर्गत वाहनचालकांचे नेत्र तपासणी आणि आरोग्‍य तपासणी शिबिर घेण्‍यात आले.

अमित शहा यांच्या पुणे दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर आपच्या कार्यकर्त्यांची धरपकड !

गृहमंत्री अमित शहा यांच्या पिंपरी-चिंचवड मधील दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर ६ ऑगस्ट या दिवशी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची धरपकड करण्यात आली.

नारायणगाव (पुणे) येथे प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या समाधीस्‍थळी त्‍यांच्‍या चरणांवर पवमान अभिषेक !

भवानी पेठ पुणे येथील चैतन्‍य औदुंंबर भजनी मंडळाने भक्‍तीपर भजने सादर केली. या कार्यक्रमाचे आयोजन शिर्डी येथील श्री. अजित देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाला विश्वगुरु बनवण्याच्या प्रयत्नाला हातभार लावूया ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. यात कोल्हापूर-मुंबई बंद झालेली सह्याद्री रेल्वे चालू करण्यासाठी देहली येथे २ बैठका झाल्या आहेत.

सिंधुदुर्ग : ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर कालावल खाडीत वाळूचे अवैध उत्खनन करणार्‍यांवर कारवाई !

पोलीस आणि महसूल विभाग यांनी ही कृती आधीच का केली नाही ? ग्रामस्थांच्या मागणीवर कृती करणारे नको, तर अवैध गोष्टी स्वत:हून थांबवणारे पोलीस प्रशासन हवे !

‘ईडी’ने प्रतिबंधित संघटना ‘पी.एफ्.आय.’ची २.५३ कोटी रुपयांची अचल संपत्ती केली जप्त !

बंदी लादण्यात आलेल्या जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कोट्यवधी रुपयांची संपत्ती ५ ऑगस्ट या दिवशी जप्त करण्यात आली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) केलेल्या या कारवाईमध्ये केरळ राज्यातील २.५३ कोटी रुपयांच्या अचल संपत्तीचा समावेश आहे.