शेतकर्‍यांच्या हितासाठी राज्यशासनाने विमा योजना लागू करावी ! – खासदार उदयनराजे भोसले

खासदार उदयनराजे भोसले

सातारा, ७ ऑगस्ट (वार्ता.) – महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकर्‍यांच्या हितासाठी विमा योजना लागू करावी, अशी मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे, तसेच शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय उपचार नागरिकांना विनामूल्य करण्याच्या मागणीस मान्यता दिल्याने खासदार उदयनराजे यांनी राज्यशासनाचे अभिनंदन केले आहे.

खासदार उदयनराजे म्हणाले की, कृषिरत्न कृषी भूषण डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांच्या समवेत भूमाता दिंडीच्या माध्यमातून विमा योजनेची मागणी खासदार उदयनराजे यांनी केली होती. ही योजना शेतकर्‍यांसाठी महत्त्वाची आर्थिक गुंतवणूक आणि त्यातील जोखीम याचा समन्वय साधून तशी हमी राज्यशासनाने द्यावी, हे या योजनेचे मूळ आहे. शेतकर्‍यांना पीक लागवडीच्या खर्चाच्या उत्पन्नाची हमी देणारी ही योजना लागू व्हावी, तसेच शासकीय रुग्णालयातून विनामूल्य उपचार झाले पाहिजेत. राज्यातील गोरगरीब, तसेच सर्वच लोकांना कोणताही भेदभाव न करता उपचार मिळायला हवेत. या आमच्या मागणीला मंत्रीमंडळाच्या निर्णयामुळे यश आले आहे.