
नारायणगाव (जिल्हा पुणे), ६ ऑगस्ट (वार्ता.) – कांदळी येथील आश्रमात अधिकमास (पुरुषोत्तम मास) निमित्त ६ ऑगस्ट या दिवशी सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या (प.पू. बाबांच्या) चरणांवर पवमान अभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ ते दुपारी १२.३० या वेळेत हा अभिषेक करण्यात आला. श्री. प्रशांत कुलकर्णी, सौ. सुषमा कुलकर्णी, तसेच श्री. रमेश लोहार, सौ. मीना लोहार यांनी प.पू. बाबांच्या समाधीस्थळी त्यांच्या चरणांवर अभिषेक केला. त्यानंतर प.पू. बाबांच्या समाधीला अभिषेक घालून पूजा आणि आरती करण्यात आली. श्री. किशोर अत्रे, श्री. रवींद्र पेठकर, श्री. मयूर कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले. या कार्यक्रमास नाशिक येथील संत पू. रामप्रभु महाराज, प.पू. बाबांचे ज्येष्ठ पुत्र पू. नंदूदादा कसरेकर आणि पू. शशिकांत ठुसे यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास प.पू. बाबांचे महाराष्ट्रातील भक्त उपस्थित होते.
भवानी पेठ पुणे येथील चैतन्य औदुंंबर भजनी मंडळाने भक्तीपर भजने सादर केली. या कार्यक्रमाचे आयोजन शिर्डी येथील श्री. अजित देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.
संपादकीय : नद्यांचे ‘प्रशासकीय’ प्रदूषण !
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !