नाशिक येथे १५ लाखांची लाच घेतांना तहसीलदारांना अटक !

मुरूम उत्‍खननाविषयी पाचपट दंड आणि स्‍वामित्‍व धन जागाभाडे मिळून १ कोटी २५ लाख रुपयांचा दंड अल्‍प करण्‍यासाठी, तसेच स्‍थळ निरीक्षणासाठी १५ लाख रुपयांची लाच घेतांना येथील तहसीलादर नरेशकुमार बहिरम यांना अटक केली.

दौंड (पुणे) येथे केलेल्‍या कारवाईत पोलिसांनी कसायांना साहाय्‍य केल्‍याचा गोरक्षकांचा आरोप !

खाटीक गल्ली येथील इदगाह मैदानाच्‍या मागे १ जर्सी गाय आणि वासरू हत्‍येसाठी आणले आहे, अशी माहिती ३ ऑगस्‍टला रात्री गोरक्षादल, महाराष्‍ट्र राज्‍याचे गोरक्षक अक्षय कांचन यांना मिळाली.

मुंबई लोकलमध्‍ये साखळी बाँबस्‍फोट होणार असल्‍याची धमकी देणारा अटकेत !

मुंबई लोकलमध्‍ये साखळी बाँबस्‍फोट करण्‍यात येणार असल्‍याची धमकी देणारा भ्रमणभाष मुंबई पोलिसांच्‍या नियंत्रण कक्षाला आला. सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, एका व्‍यक्‍तीने लोकलमध्‍ये बाँब ठेवल्‍याचे म्‍हटले.

‘अमृत भारत स्‍थानक योजने’त महाराष्‍ट्रातील ४४ रेल्‍वेस्‍थानकांचा समावेश !

देशातील रेल्‍वेस्‍थानकांच्‍या आधुनिकीकरणासाठी राबवण्‍यात येणार्‍या ‘अमृत भारत योजने’चा ६ ऑगस्‍ट या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते शुभारंभ झाला. या योजनेत महाराष्‍ट्रातील ४४ रेल्‍वेस्‍थानकांचा समावेश आहे.

बदलापूर ते बारवी रस्‍त्‍यावरील खड्डे कि खड्ड्यात रस्‍ता ?

बदलापूर ते बारवी या २३ किलोमीटर अंतरापर्यंतचे खड्डे बुजवण्‍यासाठी महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एम्.आय.डी.सी.ने) कोट्यवधी रुपये खर्च केले; पण यंदा पुन्‍हा तेेथे मोठमोठे खड्डे पडले.

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या जीवनावर आधारित भव्‍य संग्रहालय उभारणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्‍कृतिक कार्यमंत्री

शिवसंग्रहालय भव्‍य दिव्‍य आणि अत्‍याधुनिक संकल्‍पनेवर आधारित व्‍हावे, त्‍यातून शिवरायांचे संपूर्ण जीवन जगासमोर ठेवले जावे, अशा सूचना विभागाला देण्‍यात आल्‍या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ष २०२४ च्‍या निवडणुकीत ३२५ ते ३५० जागा जिंकून परत विजयी होतील ! – भाऊ तोरसेकर

मिरज, ६ ऑगस्‍ट (वार्ता.) – एकमेकांचे विचारही न पटणारे डावे आणि पुरोगामी यांनी एकत्र येऊन एक आघाडी सिद्ध केली आहे; मात्र कुणाकडेही देशहिताचा विचार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडे देशविकासाची दृष्‍टी असून त्‍यांच्‍या नेतृत्‍वात भारत जागतिक स्‍तरावर पुढे आहे. लोकांनाही देश चालवण्‍यासाठी सक्षम नेतृत्‍व हवे असल्‍याने नरेंद्र मोदी वर्ष २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीत ३२५ ते … Read more

‘जयप्रभा स्टुडिओ’ वाचवण्यात यशस्वी ! – राजेश क्षीरसागर

कोल्हापूर शहराची अस्मिता असणारा आणि चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार अशा जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा प्रश्न गेली वर्षभर प्रलंबित होता.  

पुणे येथील सहकार क्षेत्राच्या ‘वेबपोर्टल’चे उद्घाटन !

शाहू, फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचे भले फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी अन् अमित शहाच करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीत सुट्टी न घेता सीमेवर असतात, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी आणि शहांचे कौतुक केले आहे.

इस्लाम स्वीकार, अन्यथा तुझ्या मुलीची विक्री करणार ! – अभियंता सैय्यद इम्तियाज याची हिंदूला धमकी

धर्मांध कितीही उच्चपदावर असले, तरी ते त्यांची धर्मांधता आणि हिंदुद्वेष कधीही सोडत नाहीत, हेच या घटनेवरून लक्षात येते !