‘ईडी’ने प्रतिबंधित संघटना ‘पी.एफ्.आय.’ची २.५३ कोटी रुपयांची अचल संपत्ती केली जप्त !

नवी देहली – बंदी लादण्यात आलेल्या जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कोट्यवधी रुपयांची संपत्ती ५ ऑगस्ट या दिवशी जप्त करण्यात आली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) केलेल्या या कारवाईमध्ये केरळ राज्यातील २.५३ कोटी रुपयांच्या अचल संपत्तीचा समावेश आहे.

संचालनालयानुसार जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये ४ ‘व्हिलां’चा (आधुनिक पद्धतीने बांधलेल्या घरांचा) समावेश आहे. याव्यतिरिक्त ‘मुन्नार व्हिला विस्टा योजने’च्या अंतर्गत येणार्‍या ६.७५ एकर भूमीही कह्यात घेण्यात आली आहे. या योजनेचे संचालन पी.एफ्.आय.चा केरळ प्रदेश उपाध्यक्ष एम्.के. अशरफ करत होता. अशरफ हा देहलीतील तिहार कारागृहात आहे.