‘चंद्रयान-३’च्या ‘लँडर विक्रम’ने अल्प केला वेग !

भारताच्या ‘चंद्रयान -३’च्या मोहिमेच्या अंतर्गत १८ ऑगस्टला आणखी एक टप्पा पूर्ण करण्यात आला. मुख्य यानापासून वेगळ्या झालेल्या लँडर विक्रमने त्याचा वेग अल्प (डिबूस्ट करणे) केला आहे.

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील मदरशात राष्ट्रध्वजावर ठेवण्यात आला अल्पाहार !

मदरशाच्या प्रमुखासह ४ जणांवर गुन्हा नोंद !

अररिया (बिहार) येथे पत्रकाराची घरात घुसून हत्या !

जनता दल (संयुक्त) आणि राजद सत्तेत असलेल्या बिहारमध्ये कायद्याचे राज्य नसून गुंडांचे राज्य आहे, हेच अशा घटनांतून लक्षात येते ! जेथे पत्रकार सुरक्षित नाहीत, तेथे सामान्य नागरिक सुरक्षित कसे असतील ?

काश्मीरमधील जिहादी आतंकवादी यासिन मलिक याच्या पत्नीला पाक सरकारने बनवले सल्लागार !

आतंकवाद्याची पत्नी पाक सरकारला कशा प्रकारचे सल्ले देणार, हे वेगळे सांगायला नको ! मुळात पाकिस्तान एक आतंकवादी देश असल्याने त्याचे सल्लागारही अशाच विचारांचे असणार !

एटा (उत्तरप्रदेश) येथे महाविद्यालयात कपाळावर टिळा लावण्यास प्राचार्यांनी विरोध केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

प्राचार्यांनी आरोप फेटाळला !

भारत आणि पाकिस्तान यांनी यावर्षी एकमेकांना दिल्या नाहीत स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा !

पाकने भारताच्या विरोधात कारवाया करायच्या आणि भारताने ते सहन करत पाकला त्याच्या स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा द्यायच्या, हा काळ आता संपला आहे, हेच भारत दाखवून देत आहे !

गोवा : राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याच्या प्रकरणी नाझारियो डिसोझा यांच्या विरोधात गुन्हा नोंद

पोलिसांनी नाझारियो डिसोझा याला अन्वेषणासाठी बोलावले आहे. सामाजिक माध्यमातून गोव्यातील आर्चबिशप यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी नाझारियो डिसोझा याच्या विरोधात यापूर्वी एकदा गुन्हा नोंदवला गेला आहे.

शिवप्रेमींच्या वतीने गोवा राज्यभर ‘सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ !

म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेनंतर शिवप्रेमींनी गोवाभर ‘सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ राबवण्याचा निर्धार केला आहे. या अभियानाची सांगता फर्मागुडी, फोंडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महादुग्ध-जलाभिषेक करून होणार आहे.

सनातनला दोषी ठरवणार्‍या अंनिसच्या अविवेकी पदाधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करणार ! – सनातन संस्था

दाभोलकरी अनुयायांनी लक्षात घ्यावे की, सनातन संस्था ही कायद्याच्या कक्षेत राहून या अपकीर्तीचा नक्कीच समाचार घेणार आहे आणि अविवेकी, तसेच खोटी वक्तव्ये करणार्‍यांवर न्यायालयीन मार्गाने कारवाई करणार आहे.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी येथे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्‍याला अटक आणि सुटका 

सावंतवाडी येथे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची तक्रार गोवा रेल्वे पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने गोवा पोलिसांच्या पथकाने सावंतवाडी शहरातील देशपांडे याच्या दुकानात धाड टाकली.