प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील मदरशात राष्ट्रध्वजावर ठेवण्यात आला अल्पाहार !

मदरशाच्या प्रमुखासह ४ जणांवर गुन्हा नोंद !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील गौसिया इस्लामिया जिंतुल उलूम या मदरशात राष्ट्रध्वजावर अल्पाहार ठेवण्यात आल्याचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी मदरशाच्या प्रमुखासह ४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.  राष्ट्रीय ध्वज अपमान प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पटलावर राष्ट्रध्वज अंथरून त्यावरच अल्पाहार दिला जात असल्याचे या छायाचित्रात दिसत होते. स्थानिक लोकांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी मदरशाबाहेर निदर्शने केली.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

संपादकीय भूमिका

  • पाकिस्तानमध्ये अल्पसंख्य हिंदूंनी पाकच्या राष्ट्रध्वजाचा असा अवमान केला असता, तर त्यांना ठार मारण्यात आले असते ! भारतात अल्पसंख्यांकांच्या अशा कृतींमुळेच त्यांच्या देशभक्तीवर संशय व्यक्त केला जातो, हे निधर्मीवादी कधी लक्षात घेणार ?
  • ‘अशा मदरशाला टाळे का ठोकण्यात आले नाही ?’, असा प्रश्‍न राष्ट्राभिमान्यांनी प्रशासनाला विचारला पाहिजे !