इस्लामाबाद (पाकिस्तान) – काश्मीरमधील जिहादी आतंकवादी यासिन मलिक याची पत्नी मुशाला मलिक हिला पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारचे पंतप्रधान अनवारुल हक कक्कर यांनी मानवाधिकार आणि महिला यांच्याशी संबंधित प्रकरणांसाठी विशेष सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. मुशाल मलिक ही पाकिस्तानी नागरिक आहे. यासिन मलिक सध्या देहलीच्या तिहार कारागृहात अटकेत आहे. दोघांचा विवाह वर्ष २००९ मध्ये झाला. दोघांच्या वयामध्ये २० वर्षांचे अंतर आहे. या दोघांना एक मुलगी आहे. मुशाल मलिक नेहमीच भारताच्या विरोधात विधाने करत असते. पाकमध्ये निवडणुका होणार असल्याने शरीफ सरकार बरखास्त होऊन काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात आले आहे.
आतंकी यासीन मलिक की प्रोपेगेंडाबाज बीवी मुशाल हुसैन मलिक को पाकिस्तान के अंतरिम प्रधानमंत्री अनवारुल-हक काकर ने अपना सलाहकार बनाया है।#YasinMalik #Pakistanhttps://t.co/gNzqteNY0I
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 18, 2023
संपादकीय भूमिकाआतंकवाद्याची पत्नी पाक सरकारला कशा प्रकारचे सल्ले देणार, हे वेगळे सांगायला नको ! मुळात पाकिस्तान एक आतंकवादी देश असल्याने त्याचे सल्लागारही अशाच विचारांचे असणार ! |