‘मोबाईल गेमिंग’च्या माध्यमातून धर्मांतर, भारताच्या सुरक्षेला धोका ! – आमदार नीतेश राणे, भाजप

मुंबई – ‘मोबाईल गेमिंग’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत आहे. यामध्ये जिंकण्यासाठी विशिष्ट धर्माचे विचार स्वीकारण्यास सांगण्यात येत आहेत. धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने कायदा करणे आवश्यक आहे. सीमा हैदर ‘ऑनलाईन’ ओळखीतूनच भारतात आली. मोबाईल गेमिंगच्या माध्यमातून लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या धोका निर्माण झाला असून यातून भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, अशी भीती भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत अल्पकालीन चर्चेच्या वेळी व्यक्त केली.

भाजप आमदार नितेश राणे

या वेळी नीतेश राणे म्हणाले,

‘‘धर्मांतर हा काही राजकीय विषय नाही. हा समाजिक विषय म्हणून हाताळला गेला पाहिजे. लव्ह जिहादमध्ये फसवून मुलींना पाकिस्तान, सिरीया, अफगाणिस्तान आदी देशांमध्ये नेले जात आहे. यामध्ये लग्नाचे आमिष दाखवून मुलींना फसवले जाते, हे वास्तव आपण स्वीकारले पाहिजे. आमच्या कोणत्या विवाहाला विरोध नाही; मात्र लग्नानंतर धर्म पालटण्याची सक्ती का केली जाते ? खोटी ओळख सांगून लग्न का केले जाते ? अशा घटनांमध्ये फसलेल्या मुलींना अन्य राज्यात नेले जाते. आपल्या अवतीभवती असलेल्या लोकांकडून देशाच्या विरुद्ध हे षड्यंत्र चालू आहे. अशा प्रकारांमुळेच सद्यस्थितीत फ्रान्समध्ये अराजक निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातही रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर अवैध कारवायांमध्ये सहभागी आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. राज्यातील अनधिकृत भोग्यांच्या विरोधात उच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही पोलीस कारवाई करत नाहीत. याकडे सराकरने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कायदा सर्व धर्मांना सारखाच लागू व्हायला हवा.’’