विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ४ ॲागस्टपर्यंत चालू रहाणार ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

मुंबई, २७ जुलै (वार्ता.) – विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठरल्यानुसार ४ ॲागस्टपर्यंत चालू रहाणार आहे, अशी माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी दिली. २७ जुलै या दिवशी येथील विधानभवनामध्ये कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या.

डॉ. नीलम गोर्‍हे म्हणाल्या की, मुंबई येथील आझाद मैदानात गिरणी कामगारांचे आंदोलन चालू आहे. त्याविषयी विधीमंडळात बैठक आयोजित करण्यात यावी, अशी सूचना केली. ३१ जुलै या दिवशी सभागृहाचे कामकाज होणार नाही, तसेच १ ऑगस्ट या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा असल्याने सभागृहाची बैठक होणार नाही. २ आणि ३ ऑगस्ट या दिवशी शासकीय कामकाज, विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव आणि ४ ऑगस्ट या दिवशी शासकीय कामकाज आणि अशासकीय कामकाजांचे ठराव होणार आहेत.