जागतिक उपासमारी सूचकांकामध्ये पाकिस्तान ९९ व्या स्थानावर !

जगभरात ८२ कोटी ८० लाख लोक उपाशी !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जागतिक उपासमारी सूचकांकामध्ये (ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये) पाकिस्तान १२१ देशांच्या सूचीमध्ये ९९ व्या स्थानी गेला आहे. या सूचकांकाच्या अहवालात म्हटले आहे की, सशस्त्र संघर्ष, जलवायू परिवर्तन आणि कोरोना महामारी, यांमुळे जगभरात ८२ कोटी ८० लाख लोकांवर उपाशी रहाची वेळ आली आहे. वर्ष २०३० पर्यंत कुपोषणाचा स्तर अल्प होण्याची शक्यता आहे.