(म्हणे) ‘महाविद्यालयातील हिंदु विद्यार्थिनींचे अश्‍लील व्हिडिओ बनवल्याची घटना फारच लहान !’ – गृहमंत्री डॉ. जी परमेश्‍वर

  • कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील गृहमंत्री डॉ. जी परमेश्‍वर यांचे संतापजनक विधान

  • अश्‍लील व्हिडिओच्या प्रकरणी ३ मुसलमान विद्यार्थिनींविरुद्ध गुन्हा नोंद !

गृहमंत्री डॉ. जी परमेश्‍वर

उडुपी (कर्नाटक) – येथील ‘नेत्र ज्योती’ या खासगी महाविद्यालयाच्या शौचालयामध्ये गुप्त कॅमेरे लावून विद्यार्थिनींचे अश्‍लील व्हिडिओ बनवण्याच्या प्रकरणी पोलिसांनी अलीमतुल शैफा, शबानाज आणि आलिया या ३ विद्यार्थिनींसह महाविद्यालयाच्या प्रशासनाविरुद्ध गुन्हा नोंदवला. या विद्यार्थिनी हिंदु विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवून ते त्यांच्या मुसलमान मित्रांना पाठवत होत्या. या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर येथे पोचल्या होत्या. दुसरीकडे राज्याचे काँग्रेस सरकारमधील गृहमंत्री डॉ. जी परमेश्‍वर यांनी ‘ही फारच लहान घटना आहे आणि तिला राजकीय रंग देण्याची आवश्यकता नाही. महाविद्यालयांमध्ये अशा घटना घडत असतात. भाजपने अशा लहान लहान घटनांवरून राजकारण करण्याचे टाळले पाहिजे’, असे संतापजनक आणि असंवेदनशील विधान केले.

उडुपी दुसरे ‘अजमेर’ बनू शकते ! – सामाजिक कार्यकर्त्या रश्मी सावंत यांची भीती

उजवीकडे रश्मी सावंत

या घटनेविषयी सामाजिक कार्यकर्त्या रश्मी सामंत यांनी ट्वीट करून ‘हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असा आरोप केला. यासह सामंत यांनी म्हटले की, या व्हिडिओत दिसलेल्या पीडित विद्यार्थिनी उदास आणि निराश झाल्याचे लक्षात येत आहे. त्या आत्महत्येचा विचार करू शकता. असे असतांना या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही आणि त्याचा कुणी निषेधही करत नाही.

सामंत यांनी या घटनेची तुलना वर्ष १९९२ मध्ये अजमेर येथील प्रकरणांशी केली. तेथेही महाविद्यालयांतील शेकडो हिंदु विद्यार्थिनींचे अश्‍लील छायाचित्रे काढून त्याद्वारे त्यांना ब्लॅकमेल करून त्यांचे मुसलमानांकडून लैंगिक शोषण करण्यात आले होते. यामुळे अनेक तरुणींनी आत्महत्या केली होती. ‘मला हा विचार करून भीती वाटत आहे की, उडुपी दुसरे अजमेर बनू शकते’, असे सामंत यांनी म्हटले आहे. या ट्वीटमुळे कर्नाटक पोलिसांनी रश्मी सामंत यांच्या घरी जाऊन चौकशी केली. या वेळी त्या घरी नव्हत्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या पालकांची चौकशी केली, अशी माहिती सामंत यांचे अधिवक्ता आदित्य श्रीनिवासन् यांनी दिली.

संपादकीय भूमिका 

  • कर्नाटकमध्ये काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंंना हे विधान मान्य आहे का ? आरोपी मुसलमान आणि पीडित हिंदु विद्यार्थिनी असल्यानेच काँग्रेसचे मंत्री असे विधान करत आहेत. याउलट स्थिती असती, तर एव्हाना दोषींवर कठोर कारवाई झाली असती !
  • काँग्रेसचे राज्य, म्हणजे पाकिस्तानी राजवट का असते ?, हे अशा घटनांवरून पुनःपुन्हा समोर येत असतांना हिंदू काँग्रेसींना निवडून देतात, हे हिंदूंना लज्जास्पद !