कर्मचार्‍यांना संरक्षण देणार्‍या कलमामध्ये ३ मासांत सुधारणा करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

सरकारी कर्मचार्‍यांना संरक्षण देणार्‍या कायद्याचा वापर कर्मचार्‍यांकडून शस्त्र म्हणून केला जात आहे. सामान्य माणसांची पिळवणूक केली जात असून हे कलम त्वरित रहित करावे, अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांनी विधानसभेत केली.

महिलांच्‍या विरोधातील गुन्‍ह्यांवर सहनशीलता बाळगणार नाही ! – केंद्रशासनाचे सर्वोच्‍च न्‍यायालयात प्रतिज्ञापत्र मणीपूरचे प्रकरण केंद्रीय अन्‍वेषण विभागाकडे सोपवले !

लव्‍ह जिहादमध्‍ये अडकलेल्‍या सहस्रावधी हिंदु मुलींसंदर्भातही सरकारी यंत्रणांकडून अशी भूमिका कधी घेतली जाणार ?

लोणी काळभोर (पुणे) येथे भरदिवसा किरकोळ कारणावरून ४ धर्मांधांकडून विद्यार्थ्‍यांना मारहाण !

कदमवाकवस्‍ती येथील एम्.आय.टी. कॉर्नरजवळ २६ जुलै या दिवशी किरकोळ कारणावरून सराईत गांजा तस्‍कर मंटा आणि त्‍याच्‍या ४ मुसलमान साथीदारांनी २ विद्यार्थ्‍यांना मारहाण केली आहे. चिन्‍मय साडविलकर आणि ऋषभ सातव अशी मारहाण झालेल्‍या विद्यार्थ्‍यांची नावे असून ऋषभ सातव यांनी या प्रकरणी तक्रार प्रविष्‍ट केली आहे.

कळवंडे (तालुका चिपळूण) धरणाच्या अश्मपटल (पिचींग) दुरुस्तीच्या कामाला वेग

कळवंडे लघु पाटबंधारे प्रकल्पावरील अश्मपटल (पिचींग) घसरले होते. याची तात्काळ नोंद घेत दुरुस्तीचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले. जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीही प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून पहाणी केली.

मैतेई समाजातील लोकांच्‍या घरांना ख्रिस्‍ती कुकी आतंकवाद्यांनी लावली आग !

आग विझवण्‍यासाठी गेलेल्‍या सैनिकांना कुकी महिलांनी केला विरोध ! इंफाळ (मणीपूर) – मणीपूर येथे कुकी आणि मैतेई समाजातील लोकांमध्‍ये चालू असलेल्‍या हिंसाचाराच्‍या संदर्भात प्रतिदिन नवीन घटना समोर येत आहेत. येथे २७ जुलै या दिवशी कुकी आतंकवाद्यांनी मैतेई समाजातील लोकांच्‍या घरांना आग लावल्‍यानंतर ती विझवण्‍यासाठी तेथे जाण्‍याचा प्रयत्न करणार्‍या सुरक्षायंत्रणांच्‍या सैनिकांना कुकी महिला विरोध करत असल्‍याचा … Read more

चांदेराई आणि हरचिरी येथील पूर ३६ तासांनी ओसरला : जनजीवन पूर्वपदावर

दोन दिवस मुसळधार पडलेल्या पावसाने आज विश्रांती घेतल्याने तालुक्यातील चांदेराई, हरचिरी, तोणदे, टेंभ्ये, पोमेंडी, सोमेश्वर आदी भागांतील पुराचे पाणी ओसरल्यामुळे येथील जनजीवन पूर्वपदावर चालू झाले आहे.

विधान परिषदेत भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी कागद फाडले !

विधान परिषदेत पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी सदस्यांना साधारणतः ८ ते १० मिनिटे दिली जातात; परंतु गोपीचंद पडळकर १३ मिनिटे बोलत होते. उपसभापतींनी ३ वेळा सूचना देऊनही पडळकर थांबत नव्हते, त्यामुळे . . .

हडपसर (पुणे) येथील ‘इसिस’शी संबंधित आधुनिक वैद्याला अटक !

डॉ. अदनान अली याला राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेकडून (एन्‌आयएकडून) कोंढवा परिसरातून २७ जुलै या दिवशी अटक करण्‍यात आली.

आरोपी विद्यार्थिनींनी क्षमायाचना करून त्‍यांच्‍या कृत्‍याची स्‍वीकृती दिली असतांना त्‍यांना निर्दोष ठरवणे अयोग्‍य ! – प्रमोद मुतालिक

उडुपीच्‍या ‘नेत्रज्‍योती पॅरामेडिकल’ महाविद्यालयाच्‍या प्रसाधनगृहात भ्रमणभाषच्‍या साहाय्‍याने हिंदु विद्यार्थिनींचे चित्रीकरण करण्‍यात आले नाही, असे राष्‍ट्रीय महिला आयोगाच्‍या सदस्‍या खुशबु सुंदर यांनी म्‍हटले आहे.

अहिल्‍यानगर येथे मुसलमान महिलेकडून हिंदु मुलींच्‍या धर्मांतराचा प्रयत्न !

अहिल्‍यानगर जिल्‍ह्यातील राहुरी तालुक्‍यातील उंबरे गावात एक मुसलमान महिला हिंदु मुलींचे धर्मांतर करण्‍याचा प्रयत्न करत आहे. याची माहिती उघड करणार्‍या हिंदु युवकांना अमानुष मारहाण करून पोलिसांनी त्‍यांच्‍या विरोधात खोटे गुन्‍हे नोंदवले आहेत, असे गंभीर सूत्र भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी औचित्‍याच्‍या सूत्राद्वारे २८ जुलै या दिवशी विधानसभेत उपस्‍थित केले.