आरोपी विद्यार्थिनींनी क्षमायाचना करून त्‍यांच्‍या कृत्‍याची स्‍वीकृती दिली असतांना त्‍यांना निर्दोष ठरवणे अयोग्‍य ! – प्रमोद मुतालिक

उडुपी येथील महाविद्यालयाच्‍या प्रसाधनगृहात धर्मांध विद्यार्थिनींनी हिंदु विद्यार्थिनींचे अश्‍लील व्‍हिडिओ काढल्‍याचे प्रकरण

प्रतिकात्मक चित्र

धारवाड (कर्नाटक) – उडुपीच्‍या ‘नेत्रज्‍योती पॅरामेडिकल’ महाविद्यालयाच्‍या प्रसाधनगृहात भ्रमणभाषच्‍या साहाय्‍याने हिंदु विद्यार्थिनींचे चित्रीकरण करण्‍यात आले नाही, असे राष्‍ट्रीय महिला आयोगाच्‍या सदस्‍या खुशबु सुंदर यांनी म्‍हटले आहे. खुशबू सुंदर यांच्‍या विधानाचा मी निषेध करतो. चित्रीकरण करणार्‍या विद्यार्थिनींनी क्षमायाचना करणारे पत्र दिलेले आहे, म्‍हणजे त्‍यांनी त्‍यांच्‍या कृत्‍याची स्‍वीकृती दिली आहे. असे असतांना त्‍यांना निर्दोष ठरवणे कितपत योग्‍य आहे ?, असा प्रश्‍न श्रीराम सेनेचे प्रमुख श्री. प्रमोद मुतालिक यांनी उपस्‍थित केला. ते म्‍हणाले की, राज्‍य सरकारने हे प्रकरण अत्‍यंत गांभीर्याने घेतले पाहिजे. गृहमंत्री प्रकरण दडपून टाकण्‍याविषयी बोलत आहेत, हे योग्‍य नाही.

१. ‘बेंगळुरूच्‍या डिजे हळ्ळी दंगलीमधील निरपराध्‍यांवर खटला प्रविष्‍ट करण्‍यात आला’ असे म्‍हणणारे काँग्रेसचे आमदार तनवीर सेठ यांच्‍याविषयी श्री. मुतालिक म्‍हणाले की, ही घटना घडून २ वर्षे झाली आहेत. आरोपी निरपराध होते, तर तेव्‍हाच शेठ यांनी पत्र का लिहिले नाही ? आता सत्तेवर आल्‍यावर तनवीर सेठ यांनी पत्र लिहिले आहे. याचा निषेध केलाच पाहिजे. आरोपींना सोडून दिले, तर ते पुढे निश्‍चितच आतंकवादी होतील. त्‍यांना सोडले, तर आम्‍ही संपूर्ण राज्‍यात रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करू.

२. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री अश्‍वत्‍थ नारायण म्‍हणाले की, खुशबू यांनी  ‘घटनाच घडली नाही’, असे म्‍हणणे ही त्‍यांची वैयक्‍तिक प्रतिक्रिया आहे. घटना घडली आहे, हे सत्‍य आहे. चित्रीकरण झाले आहे, हे सत्‍य आहे. घटनेविरुद्ध भाजप आंदोलन करेल, हे निश्‍चित.