पीक विमा योजनेत १ लाख शेतकर्‍यांच्या सहभागासाठी प्रयत्नशील ! – भाग्यश्री फरांदे, कृषी अधीक्षक

नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग या कारणांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकर्‍याचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी केंद्रशासनाने खरीप हंगाम वर्ष २०२३ साठी ‘पंतप्रधान पिक वीमा योजना’ पुढे चालू ठेवण्यास मान्यता दिली आहे.

(म्हणे) ‘मणीपूरमधील पीडित महिलांना न्याय देण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांना आमचा पाठिंबा !’-अमेरिका

भारतातील अंतर्गत प्रश्‍नांविषयी सोयीस्कर भूमिका घेणारी अमेरिका लव्ह जिहादमुळे भारतातील लक्षावधी हिंदु मुलींचे जीवन उद्ध्वस्त होण्यावर चकार शब्दही काढत नाही, हे जाणा !

पुण्यात पकडलेल्या २ आतंकवाद्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथील जंगलात बाँबस्फोटाची चाचणी केल्याचे उघड !

कोथरूड पोलिसांनी पकडलेल्या २ आतंकवाद्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथील जंगलात बाँबस्फोटाची चाचणी केल्याचे आतंकवादविरोधी पथकाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

भीषण उष्णतेमुळे ग्रीसच्या जंगलात लागलेली आग विझवतांना विमान दुघर्टनाग्रस्त !

भीषण उष्णतेमुळे अनेक दशकांचा विक्रम मोडणार्‍या युरोपीय देश ग्रीसची दैनावस्था झाली आहे. येथील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली आहे.

कासरगोड (केरळ) येथे मुस्लिम लीगच्या मोर्च्यामध्ये हिंदूंना जिवंत जाळण्याच्या धमक्या !

या घटनेविषयी देशातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, एम्.आय.एम्., माकप आदी राजकीय पक्ष यांनी मौन बागळले आहे, हे लक्षात घ्या !

कराची (पाकिस्तान) येथे कट्टरतावाद्यांकडून अहमदी समाजाच्या मशिदीची केली तोडफोड !

अहमद यांनी स्वतःला प्रेषित मानले होते. ते स्वतःला ‘मसीहा’ मानत. या  कारणांमुळेच मुसलमान समाज अहमदिया जातीच्या मुसलमानांना ‘मुसलमान’ न समजता ‘काफीर’ समजतो.

चीनच्या परराष्ट्र मंत्रीपदी वांग यी यांची नियुक्ती !

चिनी सरकारने एक मासापासून गायब असलेले त्याचे परराष्ट्रमंत्री किन गैंग यांना पदावरून हटवले आहे. त्यांच्याजागी वांग यी यांची मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वांग हे वर्ष २०१३ ते २०२२ या कालावधीतही चीनचे परराष्ट्र मंत्री होते.

गोरखा सैनिकांच्या भारतीय सैन्यातील भर्तीवर नेपाळने ठोस निर्णय घेतलेला नाही !

नेपाळने अग्निपथ योजनेच्या अंतर्गत भारतीय सैन्यामध्ये त्याच्या गोरखा सैनिकांच्या भर्तीवर साधारण एक वर्षापूर्वी स्थगिती आणली होती. असे असले, तरी हे प्रकरण पूर्णत: समाप्त झालेले नाही, असे वक्तव्य भारतातील नेपाळचे राजदूत शंकर प्रसाद शर्मा यांनी केले.

पुढील ३ दिवस देशातील २२ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता !

दक्षिण आणि किनारी ओडिशातील अनेक भागांत मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. मच्छिमारांना २७ जुलैपर्यंत समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे.

सर्व शासकीय कार्यालये आणि शाळा यांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा लावण्यात यावी !- रवींद्र धंगेकर, आमदार, काँग्रेस

छत्रपती संभाजी महाराज यांचा राष्ट्रपुरुषांच्या सूचीत समावेश करावा, तसेच शाळा आणि सर्व शासकीय कार्यालये यांमध्ये त्यांची प्रतिमा लावण्यात यावी.