कासरगोड (केरळ) – कासरगोड जिल्ह्यातील कन्हानगड येथे मुस्लिम लीगने समान नागरी कायद्याच्या विरोधात काढलेल्या मोर्च्यामध्ये हिंदूंना ठार मारण्याच्या घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ समाजिक माध्यमांतून प्रसारित झाला. या व्हिडिओवरून सामाजिक माध्यमांवर टीका होत आहे. दुसरीकडे हिंदुविरोधी घोषणा दिल्याच्या प्रकरणी ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या वतीने संबंधित तरुणावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचेे सांगण्यात येत आहे; मात्र याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. (एखाद्या तरुणावर अशा प्रकारची कारवाई करून अशा संघटनांची खरी मानसिकता लपून रहात नाही. केंद्र सरकारने अशा संघटनांवर बंदी घालून संबंधितांना कारागृहात डांबले पाहिजे ! – संपादक)
‘We will hang you in the temple, we will burn you alive’: Anti-Hindu slogans raised at IUML’s youth wing rally in Kerala’s Kasargodhttps://t.co/scBmF0wdGI
— OpIndia.com (@OpIndia_com) July 26, 2023
भाजपच्या माहिती आणि तंत्रज्ञान शाखेचे प्रमुख अमित मालवीय यांनी हा व्हिडिओ प्रसारित केला. त्यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे की, काँग्रेससमर्थक ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या युवा शाखेने केरळमधील कासरगोड येथे मोर्चा काढला आणि हिंदुविरोधी घोषणा दिल्या. हिंदूंना फाशी देण्याची आणि जिवंत जाळण्याची धमकी देण्यात आली. पिनराई विजयन् सरकारने त्यांना सहकार्य केले नसते, तर एवढ्या पुढे जाण्याचे त्यांचे धाडस झाले नसते. केरळमध्ये आता हिंदु आणि ख्रिस्ती सुरक्षित आहेत का?
यापूर्वीही हिंदु आणि ख्रिस्ती यांना ठार मारण्याच्या देण्यात आल्या होत्या घोषणा !
अमित मालवीय यांनी या व्हिडिओसह मागील एका मोर्च्याचा संदर्भ देत म्हटले आहे, ७ वर्षांच्या एका मुलाने वडिलांच्या खांद्यावर बसून ‘हिंदु आणि ख्रिस्ती यांना त्यांच्या अंतिम संस्कारासाठी तांदूळ, फुले अन् कापूर सिद्ध ठेवा’, अशा घोषणा दिल्या होत्या.’ या प्रकरणी नंतर पोलिसांनी या मुलावर कारवाई केली होती.
संपादकीय भूमिका
|