भीषण उष्णतेमुळे ग्रीसच्या जंगलात लागलेली आग विझवतांना विमान दुघर्टनाग्रस्त !

दोन्ही वैमानिक मृत्यूमुखी !

एथेन्स (ग्रीस) – भीषण उष्णतेमुळे अनेक दशकांचा विक्रम मोडणार्‍या युरोपीय देश ग्रीसची दैनावस्था झाली आहे. येथील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. अशातच देशातील एव्हिया द्वीपावर असलेल्या जंगलात लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करणारे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. यामध्ये वैमानिक आणि त्याचा सहकारी यांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून हा अपघात २५ जुलैच्या दुपारी घडला.


जंगलाच्या एका उंच झाडाच्या शाखेमध्ये विमानाचा एक भाग अडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. एव्हिया द्वीपावरील प्लैटनिस्टो गावाजवळ हा अपघात घडला.