चीनच्या परराष्ट्र मंत्रीपदी वांग यी यांची नियुक्ती !

एक मासापासून गायब असलेले किन गैंग यांना पदावरून हटवले !

डावीकडून वांग यी आणि किन गैंग

बीजिंग (चीन) – चिनी सरकारने एक मासापासून गायब असलेले त्याचे परराष्ट्रमंत्री किन गैंग यांना पदावरून हटवले आहे. त्यांच्याजागी वांग यी यांची मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वांग हे वर्ष २०१३ ते २०२२ या कालावधीतही चीनचे परराष्ट्र मंत्री होते.

वर्ष २०२१ मध्ये किन गैंग यांच्याकडे अमेरिकेच्या राजदूतपदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये त्यांना परराष्ट्र मंत्रीपद देण्यात आले. त्यांना राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे विश्‍वासू म्हणून ओळखले जाते. किन गैंग गायब झाल्याविषयी अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. त्यांचे हाँगकाँगमधील एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराशी प्रेमप्रकरण चालू असल्याचेही बोलले जात आहे.