गोरखा सैनिकांच्या भारतीय सैन्यातील भर्तीवर नेपाळने ठोस निर्णय घेतलेला नाही !

काठमांडू (नेपाळ) – नेपाळने अग्निपथ योजनेच्या अंतर्गत भारतीय सैन्यामध्ये त्याच्या गोरखा सैनिकांच्या भर्तीवर साधारण एक वर्षापूर्वी स्थगिती आणली होती. असे असले, तरी हे प्रकरण पूर्णत: समाप्त झालेले नाही, असे वक्तव्य भारतातील नेपाळचे राजदूत शंकर प्रसाद शर्मा यांनी केले. शर्मा म्हणाले की, दोन्ही सरकारांकडून या सूत्रावर अद्याप सखोल चर्चा झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणी संवाद पूर्णपणे बंद झाला नाही.

ते पुढे म्हणाले की, नेपाळला वाटते की, गोरखा सैनिकांची भर्ती आधीच्या नियमांप्रमाणेच व्हावी. नेपाळ सरकारने यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही; परंतु भारतीय सैन्यात गोरखा सैनिकांची भर्ती करावी कि नाही ?, या विषयावर चर्चा चालू आहे.