(म्हणे) ‘मणीपूरमधील पीडित महिलांना न्याय देण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांना आमचा पाठिंबा !’-अमेरिका

भारताच्या अंतर्गत प्रश्‍नांमध्ये नाक खुपसणार्‍या अमेरिकेचा साळसूदपणा !

नवी देहली – मणीपूरमध्ये २ महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढल्याच्या प्रकरणात अमेरिकेने पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे. अमेरिकी सरकारचे प्रवक्ते वेदांत पटेल यांनी मणीपूरच्या संदर्भात अमेरिकेची भूमिका मांडतांना म्हटले की, मणीपूरमध्ये २ महिलांवर झालेल्या आक्रमणाचा व्हिडिओ पाहून आम्हाला धक्का बसला आणि आम्ही भयभीत झालो. लिंगभेदावर आधारित या हिंसाचारातील पीडित महिलांप्रती आम्ही सहवेदना व्यक्त करतो. तसेच या महिलांना न्याय देण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांना आम्ही पाठिंबा दर्शवतो.


पटेल पुढे म्हणाले की,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः महिलांवरील हे आक्रमण सभ्य समाजाला लाज वाटावी, असे असल्याचे म्हटले आहे. या हिंसाचारावर शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक उपाययोजना करण्याला आम्ही प्रोत्साहन देतो. सर्व समूहांमधील नागरिकांचे जीव वाचवणे, त्यांच्या संपत्तीचे रक्षण करणे आणि त्यांच्या मानवी आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रशासनाला प्रोत्साहन देतो, असेही पटेल यांनी नमूद केले. अमेरिकी सरकारच्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानी पत्रकाराने मणीपूर हिंसाचारावर प्रश्‍न विचारला असता पटेल बोलत होते. (पाकिस्तानी पत्रकाराचा भारतद्वेष ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • भारतातील अंतर्गत प्रश्‍नांविषयी सोयीस्कर भूमिका घेणारी अमेरिका लव्ह जिहादमुळे भारतातील लक्षावधी हिंदु मुलींचे जीवन उद्ध्वस्त होण्यावर चकार शब्दही काढत नाही, हे जाणा !
  • पाकिस्तान अथवा बांगलादेश येथील असंख्य हिंदु महिलांवरील अनन्वित अत्याचारांविषयी अमेरिकेला कधीच कळवळा का येत नाही ?