भारताला ‘इंडिया’ नाव ब्रिटिशांनी दिल्याने आपल्याला वसाहतवादी गोष्टींपासून मुक्त व्हायला हवे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

भारत सरकारने अधिकृतरित्या देशाचे ‘भारत’ हे नाव घोषित करून ‘इंडिया’ नाव रहित केले पाहिजे, असेच भारतियांना वाटते !

मोगरा नाल्यावरील अतिक्रमणाची चौकशी करून कारवाई करू ! – उदय सामंत, उद्योग मंत्री

मोगरा नाल्याचे बांधकाम हे महानगरपालिकेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार केले आहे. ते जर चुकीच्या पद्धतीने केले गेले आहे, तर महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांवर तसेच ठेकेदारांवर कारवाई करणार का ?

जम्मू-काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांना ठार केले, तरी तेथे स्थानिक हिंदू आणि देशातून गेलेले अन्य हिंदू असुरक्षितच आहेत, हे सातत्याने अशा घटनांतून दिसून येते ! ही स्थिती धर्माचरणी लोकांचे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

जेथे-जेथे नमाजाची ठिकाणे पाडली गेली, तेथे-तेथे हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती सापडल्या ! – आमदार श्री. राजू मामा भोळे

पांडववाडा या नावावरूनच आपल्याला हा हिंदूंचा प्राचीन ऐतिहासिक वारसा आहे हे लक्षात येते. जो जुना इतिहास आहे तो कोणालाही पुसता येणार नाही. म्हणूनच पांडववाड्यातील अनधिकृत मदरसा आणि तेथील नमाजपठणावर बंदी घातल्याचा अंतरिम आदेश योग्यच आहे.

उत्तराखंडमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटानंतर विजेचा धक्का बसल्याने १५ जणांचा मृत्यू

चमोली येथील अलकनंदा नदीजवळ ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटानंतर विजेचा धक्का बसल्याने १५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले.

सीमा हैदर हिला भारतात घुसवण्यामागे षड्यंत्र !

भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिची उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाकडून चौकशी चालू आहे. तसेच गुप्तचर विभागही अन्वेषण करत आहे. त्यांच्या अन्वेषणातून सीमा हैदर हिला नेपाळमार्गे भारतात पोचण्यासाठी तिसर्‍या व्यक्तीने साहाय्य केल्याची माहिती मिळाली आहे.

न्यायमूर्तींची रेल्वेत गैरसोय : अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून रेल्वे विभागाला नोटीस !

न्यायमूर्तींसारख्या उच्चपदस्थ व्यक्तीची इतकी गैरसोय होत असेल, तर सर्वसामान्य लोकांवर काय परिस्थिती ओढवत असेल ?, याचा विचारच न केलेला बरा !

देशातील १५ राज्यांमध्ये पूरसदृश स्थिती !

देशात मोसमी पावसाचे आगमन होऊन ५० दिवस उलटून गेले आहेत. देशातील उत्तर भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. महाराष्ट्रातील कोकण, तसेच गोवा राज्यात चांगला पाऊस पडला आहे.

रतलाम येथे ‘अल् सुफा’ आतंकवादी संघटनेच्या ठिकाणांवर एन्.आय.ए.ची धाड !

या ठिकाणी बाँब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. इम्रान आणि त्याचे साथीदार आतंकवादी कट रचण्यासाठी या ठिकाणाचा वापर करत होते. जयपूर येथे घातपात करण्याचा इम्रान याच्यावर आरोप आहे.

सीमा हैदर हिच्यावर कारवाई न झाल्यास तिला भारताबाहेर पाठवू ! – करणी सेनेची चेतावणी

सीमा हैदर हिच्यावर आतंकवादविरोधी पथक लवकर कारवाई करणार असेल, तर ठीक आहे, अन्यथा करणी सेना तिला देशाबाहेर पाठवेल, अशी चेतावणी करणी सेनेचे उपाध्यक्ष मुकेशसिंह रावल यांनी दिली आहे.